शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मराठवाड्यातील पाणीसाठा तिशीतच : पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 07:00 IST

पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यातील पर्जन्य छायेच्या भागाला जलयुक्त केले आहे

ठळक मुद्देगोदावरींमुळे औरंगाबाद विभागाला दिलासा

पुणे : पश्चिम महाराष्ट्र जलसंकटातून आता सावरत असला तरी मराठवाडा व विदर्भाच्या भागात समाधानकारक पाऊस नसल्याने हा भाग कोरड्या दुष्काळाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यातील पर्जन्य छायेच्या भागाला जलयुक्त केले आहे. तर, गोदावरीने औरंगाबाद विभागाची जीवन वाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात जलप्राण फुंकले आहेत. यंदा जायकवाडीत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने मराठवाड्यातील बऱ्याचशा भागाला दिलासा मिळाला आहे. राज्यात झालेल्या विषम पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र ओल्या दुष्काळाला सामोरा जात आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर व साताऱ्याला पुराच्या पाण्याचा फटका बसला. भीमा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल ११७.४७ अब्ज घनफुाटंचे असलेले राज्यातील सर्वात मोठे धरण भरले. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागल्याने पाऊस नसतानाही सोलापूर जिल्ह्यातील काही गावे पाण्याने वेढली गेली. कृष्णा खोऱ्यात झालेल्या पावसामुळे सांगली, कोल्हापूर व साताऱ्यात थैमान घातले. उत्तर कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागल्याने तेथेही नदीकाठची घरे पाण्याखाली गेली. भीमा आणि कृष्णामाईने आपला काठ सोडल्याने पश्चिम महाराष्ट्रात जलसंकट आले. राज्यातील मराठवाडा व विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस पेरणी झालेली नाही. मराठवाड्याच्या अमरावती विभागातील मोठ्या प्रकल्पात क्षमतेच्या २९ व औरंगाबादला ४६ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागातील मोठे प्रकल्पांपैकी वाण धरणात २.१९ (७५.८८ टक्के), ऊर्ध्व वर्धा ९.३५ (४७ टक्के), ५.०३ (१४.८ टक्के) टीएमसी पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागातील जायकवाडी धरणात ७०.१५ टीएमसी (९१.५१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गोदावरी खोºयात झालेल्या दमदार पावसामुळे यंदा जायकवाडीधरण भरणाच्या मार्गावर आहे. येलदरी धरणाची उपयुक्त साठ्याची क्षमता २.८.५०, निम्न मनार ४.८८ व निम्न तेरणा धरणाची क्षमता ३.२२ टीएमसी आहे. मात्र धरणांत सध्या उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदभार्तील बºयाच भागाला पाणीटंचाईच्या झळा बसू शकतात, असे चित्र आहे. --१९ आॅगस्ट अखेरचा उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमधे विभाग        साठा टीएमसी    आजची टक्केवारी        गेल्यावषीर्ची टक्केवारी अमरावती    २८.३२        २७.८९            ४३.३औरंगाबाद    ७९.५९        ३०.५८            १९.३२    कोकण    १०६.७६        ८६.१४            ८९.७५    नागपूर    ६३.६८        ३९.१५            ४०.३१    नाशिक    १२७.९५        ६०.३५            ५६    पुणे        ४५५.४९        ८४.८            ७९.५६एकूण        ८७४.७९        ६०.५८            ५७.९८    ---भीमा-कृष्णा खोऱ्यातील प्रमुख धरणातील साठा टीएमसीत धरण               टीएमसी    टक्केवारीकोयना             ९४.९३       ९४.८२धोम                १०.९५        ९३.९६वारणावती       २५.५८        ९२.९५दूधगंगा           २२.९५         ९५.७२ऊरमोडी           ९.४०         ९७.४२डिंभे                १२.४२        ९९.४३पवना              ८.४६         ९९.४४मुळशी             १८.४६        १००वरसगाव         १२.८२        १००पानशेत           १०.६५        १००निरा देवघर    ११.७३         १००भाटघर         २३.५०         १००वीर              ९.३४          ९९.२८उजनी           ५३.५७         १००        

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊसWaterपाणी