तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 06:33 IST2025-07-17T06:32:52+5:302025-07-17T06:33:08+5:30

मोबाइलवरील ऑनलाइन गेमच्या आहारी तरुणाई

Online game addiction among youth; Two commit suicide after not meeting target | तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या

तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
पारनेर (जि. अहिल्यानगर)  : पारनेर तालुक्यातील एका तरुणाने ऑनलाइन गेमच्या विळख्यात अडकल्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांत अधिकृत काहीही नोंद नाही. त्याच्या मित्रानेही ऑनलाइन गेममुळे आत्महत्या केल्याची चर्चा आहे.  

सदर तरुण हा बारावी उत्तीर्ण झाला होता. तो अहिल्यानगर शहरात मित्रांसोबत खोलीवर राहत होता. मित्रांबरोबर राहून शिक्षण घेत असताना तो ऑनलाइन गेमच्या जाळ्यात फसला. आपले शिक्षण पूर्ण करून गावाकडे आला असतानाही ऑनलाइन गेम त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. चार दिवसांपूर्वी घरातील आई-वडिलांसह इतर सदस्य शेती कामासाठी गेले असताना घरी गळफास घेतला. 
या तरुणाच्या आणखी एका मित्रानेही काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र, पालकांनी याबाबत पोलिसांत काहीही माहिती दिलेली नसल्याने अधिकृतपणे यावर कुणीही शिक्कामोर्तब केले नाही.

खामगाव (जि. बुलढाणा) : राज्यातील युवकांचे वर्तन दिवसेंदिवस अधिकच बिघडत असल्याचे चिंताजनक वास्तव पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या १५ दिवसांत राज्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या ५,२०८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात १८ ते ३५ वयोगटातील ३,५७३ युवकांचा समावेश आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. 
राज्यातील विविध पोलिस विभागांकडून अमली पदार्थांचे सेवन, बेकायदेशीर जमावबंदीचे उल्लंघन, आदी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, १८ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना दिसत असून, काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

Web Title: Online game addiction among youth; Two commit suicide after not meeting target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.