‘आॅनलाईन’ वीज देयकाची कोटीची उड्डाणे!
By Admin | Updated: August 8, 2016 15:54 IST2016-08-08T15:54:22+5:302016-08-08T15:54:22+5:30
वीज देयक भरण्यासाठी महावितरणच्या स्विकृती केंद्रांवर नागरिकांच्या रांगा हे चित्र आता बदलत असून, आधूनिक काळात ‘टेक्नोसेव्ही’ झालेल्या जिल्ह्यातील वीज ग्राहकांचा

‘आॅनलाईन’ वीज देयकाची कोटीची उड्डाणे!
>- अतुल जयस्वाल
अकोला, दि. 8 - वीज देयक भरण्यासाठी महावितरणच्या स्विकृती केंद्रांवर नागरिकांच्या रांगा हे चित्र आता बदलत असून, आधूनिक काळात ‘टेक्नोसेव्ही’ झालेल्या जिल्ह्यातील वीज ग्राहकांचा ओढा आता देयक ‘आॅनलाईन’ भरण्याकडे अधिक झाला आहे. जुलै महिन्यात जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील १३०२१ ग्राहकांनी तब्बल ३ कोटी ४३ लाख ६७ हजार ७८० रुपयांचे वीज देयक महावितरणचे संकेतस्थळ तसेच अॅपच्या माध्यमातून ‘आॅनलाईन’ भरल्याची माहिती समोर आली आहे.
आधुनिक काळात सर्वच व्यवहार आता ‘आॅनलाइन’ होत असताना महावितरणने वीज बिल भरण्यासाठी संकेतस्थळावर ‘आॅनलाइन’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच मोबाईल अॅपद्वारेही वीज देयक भरता येते. ‘टेक्नोसॅव्ही’ झालेले वीज ग्राहक आता या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ उचलत आहेत. महावितरणच्या अकोला ग्रामीण व आकोट या विभागाअंतर्गत येत असलेल्या अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, पातुर, आकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा उपविभाग आणि अकोला शहर या विभागाअंतर्गत येत असलेल्या ३ उपविभाग अशा १० उपविभागांमधील एकून १३०२१ वीज ग्राहकांनी जुलै २०१६ या एकाच महिन्यात ३ कोटी ४३ लाख ६७ हजार ७८० रुपयांचे वीज देयक भरले. यासाठी त्यांनी महावितरणचे संकेतस्थळ व मोबाईल अॅपचा वापर केला. ग्रामीण भागातही आता ‘आॅनलाईन’ देयक भरण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.