शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

तिखट कांद्याची गोड बातमी; पुढच्या १५ दिवसांत १५ रुपयांनी होणार स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 2:06 AM

देशात उत्पादनात २६% घट होण्याचा अंदाज

योगेश बिडवई

मुंबई : अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने किरकोळ बाजारात १00 रुपये किलोवर गेलेला आणि आता ६0-६५ रुपये किलो असलेल्या कांद्याचा राज्यात पुरवठा वाढल्याने तो महिनाअखेर ५0 रुपयांच्या खाली येण्याची स्थिती आहे. राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढत असून, मालाचा दर्जाही चांगला असल्याने देशभरातही लवकरच सुरळीत पुरवठा होण्यास मदत होणार आहे.

ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने कांद्याच्या लागवडीस व पिकालाही मोठा फटका बसला. साहजिकच, खरिपाचे उत्पादन घटून ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात राज्यात कांद्याची आवक २५ लाख क्विंटल म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आली होती. नोव्हेंबर महिन्यात आवक वाढून ४0 लाख क्विंटल झाली. तरीही त्यात सुमारे २५ ते ३0 टक्के घट होती. जानेवारीत आता आवक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार १३ जानेवारीपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुमारे २४ लाख क्विंटल आवक झाली आहे. तर घाऊक बाजारात क्विंटलला सर्वसाधारण भाव ३,३६६ रुपये आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात सुमारे ५५ हजार क्विंटल आवक होईल, असा अंदाज आहे. दरवर्षी जानेवारीत ६५ ते ७0 क्विंटल आवक होते, म्हणजे जानेवारीतही मागणीच्या तुलेन १0 ते १५ क्विंटल पुरवठा कमीच राहणार आहे.

मात्र दिलासादायक म्हणजे नाशिक जिल्ह्यांतील लासलगाव, पिंपळगाव, उमराणे आदी बाजार समित्यामंध्ये आवक चांगली वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात जानेवारी महिन्यात साधारणपणे एक ते सव्वा लाख क्विंटल आवक होत असते. जानेवारी महिन्यात रोज साधारणपणे एक लाख क्विंटल माल बाजारात येत आहे. शिवाय आठवडाभरापासून मालाचा दर्जाही चांगला आहे.यंदा ५२ लाख टन उत्पादन अपेक्षितभारतात २0१९-२0 मध्ये कांद्याच्या खरिप, लेट खरिप उत्पादनात साधारणपणे २६ टक्के घट होऊन ५२.0६ लाख टन होईल, असा अंदाज केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केला आहे. देशात गेल्या वर्षी कांद्याचे ६९.९१ लाख टन उत्पादन झाले होते. 

टॅग्स :onionकांदा