गॅस बुकिंगमध्ये केलेल्या एका चुकीने खाते होईल रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:38 IST2026-03-15T13:37:50+5:302026-03-15T13:38:09+5:30

बनावट वेबसाइट्स हुबेहूब अधिकृत कंपन्यांसारख्या दिसतात. तिथे दिलेल्या नंबरवर कॉल केल्यास समोरील व्यक्ती स्वतःला गॅस एजन्सीचा प्रतिनिधी सांगतो. बुकिंग कन्फर्म करण्यासाठी ओटीपी मागून ॲडव्हान्स पेमेंट भरण्यास सांगितले जाते. पैसे भरताच नंबर बंद होतो आणि तुमची फसवणूक होते.

One mistake in gas booking will empty the account | गॅस बुकिंगमध्ये केलेल्या एका चुकीने खाते होईल रिकामे

गॅस बुकिंगमध्ये केलेल्या एका चुकीने खाते होईल रिकामे

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच आता गॅस टंचाईचा लाभ उठविण्यासाठी सायबर भामटेही सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. सध्या टंचाईच्या भीतीपोटी अनेक ग्राहक घाईघाईने एलपीजी सिलिंडर बुक करण्याचा प्रयत्न करत आहेत. हीच घाई सायबर गुन्हेगारांसाठी 'संधी' ठरत आहे. सध्या इंटरनेटवर 'एलपीजी स्कॅम'चे जाळे पसरले असून, सावध न राहिल्यास आर्थिक नुकसान होण्याचा धोका आहे.

ओटीपी, पेमेंटचा बनाव
बनावट वेबसाइट्स हुबेहूब अधिकृत कंपन्यांसारख्या दिसतात. तिथे दिलेल्या नंबरवर कॉल केल्यास समोरील व्यक्ती स्वतःला गॅस एजन्सीचा प्रतिनिधी सांगतो. बुकिंग कन्फर्म करण्यासाठी ओटीपी मागून ॲडव्हान्स पेमेंट भरण्यास सांगितले जाते. पैसे भरताच नंबर बंद होतो आणि तुमची फसवणूक होते.

कशी घ्याल काळजी?
अधिकृत ॲपचाच वापर करा : गॅस बुकिंगसाठी कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲप, वेबसाइटचाच वापर करा.
अनोळखी लिंक टाळा : व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करून पेमेंट करू नका.
गोपनीय माहिती शेअर करू नका : अधिकृत गॅस कंपन्या फोनवर ओटीपी, पिन किंवा बँक खात्याची माहिती मागत नाहीत.
आगाऊ रक्कम देऊ नका : अनोळखी व्यक्तीला किंवा संशयास्पद लिंकवरून आगाऊ पैसे भरू नका.

Web Title : गैस बुकिंग में गलती: साइबर धोखेबाजों के नए घोटाले से खाता खाली

Web Summary : एलपीजी घोटालों से सावधान! साइबर अपराधी गैस की कमी के डर का फायदा उठाकर नकली वेबसाइटों और ओटीपी अनुरोधों का उपयोग करके पैसे चुराते हैं। सुरक्षित रहने के लिए आधिकारिक ऐप्स का उपयोग करें, संदिग्ध लिंक से बचें और कभी भी संवेदनशील जानकारी साझा न करें या अज्ञात स्रोतों को पहले से भुगतान न करें।

Web Title : Gas Booking Error: Account Emptied by Cyber Fraudsters' New Scam

Web Summary : Beware of LPG scams! Cybercriminals exploit gas shortage fears, using fake websites and OTP requests to steal money. Use official apps, avoid suspicious links, and never share sensitive information or prepay unknown sources to stay safe.