शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

हिरव्या स्वप्नांवर अवकाळीचा नांगर, खरिपानंतर हाती येणाऱ्या रब्बीलाही झोपवले; राज्यातील ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 08:08 IST

Unseasonal Rain: राज्यातील सर्वच भागात दाेन दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक  अंदाज कृषी विभागाने वर्तविला.

पुणे - राज्यातील सर्वच भागात दाेन दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक  अंदाज कृषी विभागाने वर्तविला. सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यात सुमारे ३४ हजार हेक्टरवर झाले असून, नाशिक व नगर जिल्ह्यांत द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे.

अतिवृष्टी व गारपिटीने १७ जिल्ह्यांमध्ये शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारी व रविवारी पाऊस झाला. पूर्व विदर्भ वगळता सर्वच जिल्ह्यांत पावसाची नोंद झाली. राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार असल्याने पिकांना आणखी फटका बसू शकतो. पावसामुळे हवेत गारवा आल्याने थंडी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

विदर्भ विदर्भात अकोला, वाशिम बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. बुलढाण्यात गारपीट झाली आहे. कपाशी, तूर आणि संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे. 

मराठवाडा मराठवाड्यालाही अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. विभागात एकाच रात्रीत ४०.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीने २,१४० गावांतील पिके संकटात आली आहेत.  

खान्देश  खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील २८ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. अहमदनगर जिल्ह्यातही अतोनात नुकसान झाले आहे. घरांची मोठी पडझड झाली आहे.  

तत्काळ पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतीच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश सोमवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ज्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, तेथील जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेऊन अहवाल तातडीने सरकारकडे पाठविण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर नुकसानभरपाई देण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

म्हणून होते गारपीट! डॉ. रंजन केळकर यांची माहिती  पुणे : हिवाळ्यामध्ये पाऊस, गारपीट हे नवीन नाही. या महिन्यात असे हवामान असतेच. नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात पाऊस पडत असतो. हिवाळ्यात पश्चिम व पूर्वेकडील दोन्ही वारे महाराष्ट्रावर भिडत असल्याने इथे वादळी पाऊस आणि गारपीट होते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक व हवामानतज्ज्ञ डॉ. रंजन केळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

जिल्हानिहाय पावसाची नोंद (मिलिमीटर) ठाणे         १८ पालघर         २६ नाशिक         २७ धुळे         २६ नंदुरबार         ६२ जळगाव         ३२ नगर         ३१ पुणे         १४ संभाजीनगर         ६१ जालना         ७१ बीड         २७ नांदेड         ३६ परभणी         ६५ बुलढाणा         ६० अकोला         ३२ वाशिम         ५० अमरावती         १४ यवतमाळ         २७ 

गुजरातमध्ये  २० मृत्यूगुजरातच्या अनेक भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. राज्याच्या विविध भागात वीज कोसळून २० जणांचा मृत्यू झाला.  दाहोदमध्ये ४, भरूचमध्ये ३, तापीमध्ये २, तर  अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाद, खेडा, मेहसाणा, पंचमहल, साबरकांठा, सूरत, सुरेंद्रनगर व द्वारकामध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र