शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 10:06 IST

एकनाथ शिंदेंसोबत अपेक्षेने गेलो, मात्र पाहिजे तशा अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत अशी खंत अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बोलून दाखवली. 

नागपूर - विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यात प्रत्येक इच्छुकाने मतदारसंघात तयारी सुरू केलीय. यातच महायुतीसोबत असणाऱ्या अपक्षांना त्यांना उमेदवारी मिळेल की नाही याची चिंता आहे.  मला महायुतीकडून लढण्याची इच्छा आहे. मी आधीपासून शिवसेनेत राहिलोय. एकनाथ शिंदेंसोबत आहे. मात्र माझ्या जागेवर भाजपा, राष्ट्रवादीनेही दावा केलाय. त्यामुळे मीदेखील बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय असा सूचक इशारा भंडारा मतदारसंघाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे.

आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, सध्यातरी युतीतून मला लढायचं आहे. मी शिवसेना-भाजपा विचाराचा आहे. परंतु परिस्थिती पुढे काय आहे, इथं भाजपा, राष्ट्रवादीचे लोक दावा करतायेत. त्या परिस्थितीत वरिष्ठांना त्यांना समजवण्यात यश आले तर काही नाही मात्र जागेच्या बाबतीत काही कमी जास्त होत असेल किंवा तिसऱ्याच पक्षाला तिकीट दिले. त्यातून आमचा जुना बॅकअप प्लॅन आहे तो तयारीत ठेवावाच लागेल. २०१९ मध्ये ही अपक्षच निवडून आलोय. एकनाथ शिंदेंसोबत चांगले संबंध आहे. मी जुन्यापासून शिवसेनेचा आहे. मी युतीच्या विचाराचा आहे. ते मला आपलेसे वाटतात असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय आम्हाला जुना अनुभव फार डेंजर आहे. तिकीट देतो, तिकिट देतो म्हणत होते, २०१९ ला उद्धव ठाकरे फोनच उचलत नव्हते. शिवसेना नेहमी मुंबई, ठाणे याला प्राधान्य देते. त्यामुळे आम्हीही पर्याय ठेवलेत. आमची मानसिकता शिवसेना-भाजपातून लढण्याची आहे परंतु परिस्थिती जर आली तर काय करायचं, घरी तर बसणार नाही त्यामुळे बॅकअप प्लॅन असायलाच हवा असं आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटलं.

दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबत जे १० अपक्ष आहेत, त्यात सर्वात पहिला आधी मी त्यांच्यासोबत गेलो होतो. भंडारा जिल्ह्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षेनुसार न्याय मिळाला नाही. बघू पुढच्या काळात काय होते, निवडणुकीला अजून वेळ आहे. जी काही आश्वासने होती ते मुख्यमंत्री करतीलच. मंत्रिपद मिळाले असतील, महायुतीत कुणालाही मिळाले असते तर जिल्ह्याला न्याय मिळाला असता. ही खंत आमच्या मनात राहणारच आहे. वरिष्ठांनी एबी फॉर्म दिला तर लढू, द्यायचं की नाही हे त्यांच्या हातात. धनुष्यबाणावर लढण्याची इच्छा मात्र जागांवर दावा पाहता कुणाला जागा मिळते त्यावर ठरवू असं अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस