शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साखर उद्योगाच्या इतिहासात यंदा प्रथमच ऑईल कंपन्यांना मिळणार ५१ कोटी लिटर इथेनॉल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 13:37 IST

देशातील ५१५ साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झाले होते. त्यापैकी १९३ कारखाने महाराष्ट्रातील आहे.

ठळक मुद्देसाखर कारखान्यांची हमी : १२ कोटी लिटरचा केला पुरवठाबी हेवी मोलॅसिस आणि थेट उसाच्या रसापासून ५१ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती देशात फेब्रुवारी अखेरीस २४७.६८ लाख टन साखरेचे उत्पादन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारखाने बंद होण्यास सुरुवात

पुणे : साखर उद्योगाच्या इतिहासात यंदा प्रथमच देशातील साखर कारखान्यांनी ऑईल कंपन्यांना ५१ कोटी लिटर इथेनॉलच्या पुरवठ्याची हमी दिली आहे. त्यापैकी १२ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा फेब्रुवारी महिना अखेरीस केला असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली. देशातील ५१५ साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झाले होते. त्या पैकी १९३ कारखाने महाराष्ट्रातील आहे. देशात यंदा ३०७ लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. फेब्रुवारी अखेरीस देशातील ४६६ कारखाने सुरु होते. तर, २४७.६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात १ मार्च अखेरीस ८३७.७२ लाख टन ऊस गाळपातून ९२.५० लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्या हंगामात देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाही ३०७ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. सलग दोन वर्षे साखरेची विक्रमी आवक होत असल्याने, अनेक कारखान्यांनी यंदा इथेनॉल निर्मितीवर भर दिला असल्याचे दिसून येत आहे. बी हेवी मोलॅसिस आणि थेट उसाच्या रसापासून ५१ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होईल. ऑईल कंपन्यांकडे तशा निविदा भरण्यात आल्या आहेत. निविदा दिल्या प्रमाणे इथेनॉलचा पुरवठा झाल्यास, ५ लाख टनांनी साखर निर्मिती घटेल. फेब्रुवारी अखेरीस देशातील साखर कारखान्यांनी १२ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. त्यामुळे साधारण १ लाख टनांनी साखर निर्मिती कमी झाली आहे. दरम्यान, देशात फेब्रुवारी अखेरीस २४७.६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील २३ कारखाने कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, १७० कारख्यांचे गाळप सुरु आहे. कर्नाटकात ४१.६९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. येथील ३२ कारखाने बंद झाले असून, ३५ कारखाने सुरु आहेत. उत्तर प्रदेशातील ११७ कारखान्यांनी ७३.६१ लाख टन साखर उत्पादित केली आहे. तमिळनाडूतील ३२ कारखान्यांनी ४.७०, गुजरातमधील १४ कारखान्यांनी ८.८०, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथील २५ कारखान्यांनी ५.७० लाख टन साखर उत्पादित केली आहे. बिहार ५.७५, उत्तराखंड २.५५, पंजाब ४.६०, हरयाणा ४.१५, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडने ४.१० लाख टन साखर उत्पादित केली आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीPuneपुणे