शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ कुटुंबीयांविरोधातील आरोपांबाबत अधिका-यांची चौकशी

By admin | Updated: March 12, 2015 05:07 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि कुटुंबियांविरोधातील घोटाळ््यांच्या आरोपाच्या अनुषंगाने

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि कुटुंबियांविरोधातील घोटाळ््यांच्या आरोपाच्या अनुषंगाने लाचलुचतप प्रतिबंधक विभागाने बुधवारी एस.एस. सोळंकी व अरूण देवधर यांची चौकशी केली.सोळंकी हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव आहेत तर देवधर सेवानिवृत्त मुख्य अभियंता, अशी माहिती एसीबीतून देण्यात आली. वरळी येथील मुख्यालयात एसीबीच्या विशेष तपास पथकाने दोन्ही अधिकाऱ्यांकडे दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ््यासह अन्य आरोपांबाबत कसून चौकशी केल्याचे समजते. त्यानंतर त्यांचे जबाबही नोंदवून घेण्यात आले. या जबाबातून पुढे आलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांकडे चौकशी केली जाईल, असेही संकेत एसीबीने दिले आहेत.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात याचिका करून भुजबळ, कुटुंबिय, बांधकाम विभागाचे अधिकारी, भुजबळ यांच्या कंपन्यांचे चालक यांच्याविरोधात हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसेच एसीबीकडून उघड चौकशीची मागणीही केली. न्यायलायाने एसीबीला उघड चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एसीबीने २० फेब्रुवारीपासून उघड चौकशी सुरू केली. आत्तापर्यंत भुजबळ यांचे चिरंजीव पंकज, पुतणे समीर यांची चौकशी करण्यात आली. भुजबळ यांना मात्र अद्याप एसीबीने चौकशीला बोलावलेले नाही. (प्रतिनिधी)