बंगला आणि गाडी देऊ मात्र त्यांनी दिवसाच यावे; शरद पवारांचा उदयनराजेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 10:05 PM2019-09-27T22:05:41+5:302019-09-27T22:30:08+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील, तर मी निवडणुकीतून माघार घेईल, असे उदयनराजेंनी म्हटले होते.

Offer a bungalow and a car, but they should arrive in day; Sharad Pawar Criticize on Udayanraje Bhosale | बंगला आणि गाडी देऊ मात्र त्यांनी दिवसाच यावे; शरद पवारांचा उदयनराजेंना टोला

बंगला आणि गाडी देऊ मात्र त्यांनी दिवसाच यावे; शरद पवारांचा उदयनराजेंना टोला

Next

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजेंनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकसोबतचं सातारा लोकसभेच्या जागेची पोटनिवडणुक देखील 21 ऑक्टोबर रोजी पार होणार आहे. मात्र जर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील, तर मी निवडणुकीतून माघार घेईल, असे उदयनराजेंनी म्हटले होते. यावर शरद पवारांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया देत बंगला आणि गाडी देऊ मात्र त्यांनी दिवसाच यावे  असं म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंना टोला लगावला आहे. 

शरद पवार उदयनराजेंच्या वक्तव्यावर म्हणाले की, उदयनराजेंच्या मानसिक स्थितीत अधिक भर घालणार नाही. तसेच सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजेंच्या विरोधात दोन- तीन उमेदवारांचा विचार चालू आहे. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील यांच्यासह सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने यांचा समावेश असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच माझी खासदारकीची टर्म सुरु असे पर्यत त्यांना बंगला आणि गाडी देऊ मात्र ते फक्त दिवसा माझ्याकडे येऊ शकतात असं मिश्कील उत्तर शरद पवारांनी पत्रकारांना दिले. शरद पवार मुंबईहून पुण्यातील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी निघाले होते. यावेळीच अजित पवारांनी राजीनामा दिल्याने शरद पवारांनी पूरग्रस्तांच्या भेटीला अरण्येश्वरला न जाता पुण्यातील मोदीबागेतील राहत्या घरी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

शरद पवार यांच्याबद्दल बोलताना उदयनराजे भावूक झाले होते, त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. ते आदरणीय कालपण होते, आजपण आहेत, भविष्यातपण राहतील. आज महाळ आहेत, असे म्हणत पूर्वजांची आठवण उदयनराजेंनी काढली. त्यावेळी, त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. त्यांच्यनंतर तेच माझ्यासाठी आहेत. शरद पवार पोटनिवडणूक लढवणार आहेत, अशी चर्चा असल्याचं विचारताच, ते उभारल्यास मी फॉर्म भरणार नाही, असं उदयनराजेंनी जाहीर केलं आहे. पण, दिल्लीतील बंगला आणि गाडी यासाठी मला मुभा द्यावी, असे म्हणत पवारांचं प्रेम मिळावं ही अपेक्षा उदयनराजेंनी व्यक्त केली होती. 

Web Title: Offer a bungalow and a car, but they should arrive in day; Sharad Pawar Criticize on Udayanraje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.