मनोज जरांगे यांना जेलमध्ये टाकण्याची ओबीसींची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 07:13 IST2025-08-26T07:13:28+5:302025-08-26T07:13:54+5:30
Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे हे राजकारण करीत असून, शुक्रवार (दि. २९) ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत धडकणार आहेत. तरी सरकारने जरांगे विरोधातील एसआयटी आहवाल सादर करून मनोज जरांगे-पाटीलवर गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकावे अशी मागणी ओबीसी नेते ॲड. मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील, नितीन बोराटे यांनी सोमवारी पुणे येथे पत्रकार परिषदेत केली.

मनोज जरांगे यांना जेलमध्ये टाकण्याची ओबीसींची मागणी
पुणे - महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे-पाटील करीत आहे. मराठा समाजाला ईडब्लूएस अंतर्गत १० टक्के आरक्षण असताना पुन्हा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे. यासाठी गेले अनेक वर्षे मराठ्यांना न्यायालयात आरक्षण टिकवता आले नाही. तरी पुन्हा राजकारण करून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा आरक्षणासाठी मैदानात उतरले आहेत. मनोज जरांगे हे राजकारण करीत असून, शुक्रवार (दि. २९) ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत धडकणार आहेत. तरी सरकारने जरांगे विरोधातील एसआयटी आहवाल सादर करून मनोज जरांगे-पाटीलवर गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकावे अशी मागणी ओबीसी नेते ॲड. मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील, नितीन बोराटे यांनी सोमवारी पुणे येथे पत्रकार परिषदेत केली.
मराठा आरक्षण असताना पुन्हा आरक्षण द्या अशी मागणी वारंवार केली जाते. मात्र, ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अन्यथा रस्त्यावर उतरून जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा ओबीसी संघटनेकडून पुण्यात देण्यात आला. यावेळी ओबीसी नेते ॲड. मंगेश ससाणे म्हणाले की, आरक्षणाची लढाई आता राहिली नाही. तरी पुन्हा पुन्हा मराठा आरक्षणाच्या नावाखाली मनोज जरांगे पाटील समाजात तेढ निर्माण करीत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुसक्या आवळून जेलमध्ये टाका अन्यथा सरकारने राष्ट्रपती राजवट लागू करावी.