शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Nupur Sharma Prophet remark row: पैगंबरांवरील वक्तव्याचा तीव्र विरोध; सोलापूर, औरंगाबाद, जालन्यासह अनेक शहरांत जोरदार निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 17:20 IST

Nupur Sharma Prophet remark row: नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदालविरोधात देशातील अनेक राज्यात तीव्र निदर्शने होत आहेत. काही ठिकाणी आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली.

Nupur Sharma Prophet remark row: भाजपची माजी प्रवक्ता नुपूर शर्माच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर देशासह विदेशातूनही जोरदार विरोध होताना दिसत आहे. गेल्या शुक्रवारी नमाजानंतर कानपूरमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. त्यानंतर आता आजही नमाजानंतर दिल्लीपासून तेलंगाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालपर्यंत अनेक राज्यात मुस्लिम समाजाकडून तीव्र आंदोल होत आहे.

नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदालविरोधात दिल्लीतील जामा मशिदीबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. त्यानंतर हळुहळू हे आंदोलन देशातील अनेक राज्यात पसरत गेले. महाराष्ट्रातही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रातील संवेदनशील अशा औरंगाबाद, परभणी, सोलापूर, जालन्यात हजारोंच्यां संख्येने मुस्लिम लोक रस्त्यावर आले. 

संबंधित बातमी- दिल्ली ते हैदराबादपर्यंत तीव्र निदर्शने; प्रयागराजमध्ये दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या शहरांसह तिकडे, नवी मुंबई आणि पनवेलमध्येही शेकडो-हजारो लोक रस्त्यावर आलें. सोलापूरमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेसाठी एमआयएम पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तर, औरंगाबादमध्येही शेकडोंच्या संख्येने जमाव विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. यावेळी खासदार इम्तिजाय जलील यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. तसेच, नुकूर शर्मा आणि जिंदाल यांच्यावर कारवाईची मागणीदेखील केली.

दिल्लीपासून तेलंगाणापर्यंत निदर्शनेनुपूर शर्मा आणि नवीन जिंदालविरोधात दिल्लीसह उत्तर प्रदेशातील प्रयागराज, सहारनपूर, मुरादाबादसह लुधियाना आणि तिकडे पश्चिम बंगालमधील कोलकातामध्येही मुस्लिम समाजाकडून जोरदार विरोध प्रदर्शन झाले. प्रयागराजमध्ये नमाजानंतर पोलिसांवर जोरदार दगडफेक झाली. गेल्या एका तासापासून विविध परिसरात दगडफेक सुरू आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांचा लाठीचार्जप्रयागराजच्या अटालापरिसरात शुक्रवारच्या नमाजानंतर शेकडो लोक जमा झाले आणि घोषणाबाजी सुरू केली. यावळी पोलीस त्यांना समजावण्यास गेली असता, त्यांनी दगडफेक सुरू केली. यात लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अजूनही अनेक ठिकाणी वातावरण शांत झाले नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMosqueमशिदMuslimमुस्लीमAurangabadऔरंगाबादSolapurसोलापूरJalna S Pपोलीस अधीक्षक, जालना