राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ५८० वर; २९ जणांचा बळी, मार्च महिन्यापासून उष्णतेची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 05:58 AM2022-05-17T05:58:35+5:302022-05-17T05:59:03+5:30

वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

number of heat stroke patients in the state is over 580 and 29 killed heat wave since march | राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ५८० वर; २९ जणांचा बळी, मार्च महिन्यापासून उष्णतेची लाट

राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ५८० वर; २९ जणांचा बळी, मार्च महिन्यापासून उष्णतेची लाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट आली आहे. परिणामी, यामुळे १ मार्च ते १४ मे या काळात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ५८० वर पोहोचली असून संशयित उष्माघाताच्या मृत्यूंची संख्या २९ झाली आहे. उष्माघात मृत्यू अन्वेषण समितीने उष्माघाताने १७ मृत्यू झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाला दिली आहे.

उष्णतेच्या लाटेचा त्रास कोणत्या व्यक्तींना होण्याची शक्यता अधिक आहे, हे लक्षात घेऊन त्यांची विशेष काळजी घेण्यात यावी, यासाठी जनतेचे प्रबोधन करण्यात येते. उष्मा काही व्यक्तींना अधिक त्रासदायक ठरू शकतो, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे. उष्णता विकारांवर उपचार करण्यासाठी सर्व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले. या वाढत्या उष्णतेमुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. त्यामुळे योग्य काळजी घेण्याचे आवाहन आवटे यांनी केले.

- उष्णतेमुळे मुख्यत्वे किरकोळ स्वरुपाचा किंवा गंभीर स्वरुपाचा त्रास या प्रकारचा असतो. किरकोळ त्रासात उष्णतेमुळे शरीरावर रॅश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे अशा स्वरुपाचा असतो, तर गंभीर प्रकारात उष्माघाताचा समावेश होतो. 

- उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृद्ध आणि लहान मुले, स्थूल लोक, अयोग्य कपडे घातलेले लोक, पुरेशी झोप न झालेले लोक, गरोदर महिला, अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेले लोक, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असलेले लोक,  काही विशिष्ट औषधे घेत असलेले लोक आणि निराश्रित, घरदार नसलेले गरीब लोक यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

जिल्हा    रुग्ण    संशयित     उष्माघात मृत्यू 
ठाणे     २          ०    ०
पुणे     ३३    ०     ०
कोल्हापूर     १          ०     ०
औरंगाबाद     १५    ५    २
लातूर    १           १    १
नाशिक     १७          ४    ४
अकोला    ५१         ४     १
नागपूर       ४६०         १५    ९
एकूण       ५८०          २९    १७

Web Title: number of heat stroke patients in the state is over 580 and 29 killed heat wave since march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.