The number of corona patients in the state halved | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर

मुंबई : राज्यात गेल्या पंधरवड्यापासून दररोज २० ते २५ हजारांदरम्यान नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडत असताना सोमवारी हा आकडा ११ हजार ९२१ वर आला आहे. आॅक्टोबर हिटची चाहूल लागली असताना संसर्गबाधितांची संख्या कमालीची घटल्याचे दिसून येत आहे.

सप्टेंबरच्या अखेरीस कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील जवळपास १० लाख ४९ हजार ९४७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. तर कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३ लाख ५१ हजार १५३ झालीअसून दिवसभरात १८० रुग्णांचा मृत्यू झाला.
सध्या २ लाख ६५ हजार ३३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात सर्वाधिक प्रमाण पुण्यातील रुग्णांचे असून ही संख्या ५७ हजार ३१० इतकी आहे.

मुंबईत २ लाख कोरोनाबाधित
च्मुंबईत सोमवारी २ हजार ५५ रुग्ण आणि ४० मृत्युंची नोंद झाली आहे. त्यामुळे शहर-उपनगरात २ लाख ९०१ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, बळींचा आकडा ८ हजार ८३४ झाला आहे.
च्मुंबईत आतापर्यंत १ लाख ६४ हजार ८८२ रुग्ण कोविडमुक्त झाले असून, सध्या २६ हजार ७८४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत अन्य कारणांमुळे ४०१ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The number of corona patients in the state halved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.