आता पाण्याचे एटीएम !
By Admin | Updated: March 23, 2015 01:12 IST2015-03-23T01:12:47+5:302015-03-23T01:12:47+5:30
कोणताही सजीव पाण्याशिवाय जगूच शकत नाही. पाण्याशिवाय धान्य उत्पादन नाही की उद्योगधंदे, कारखाने नाहीत. आपल्याकडे निसर्गचक्रानुसार पाऊस पडतो.

आता पाण्याचे एटीएम !
अविष्कार देशमुख ल्ल नागपूर
कोणताही सजीव पाण्याशिवाय जगूच शकत नाही. पाण्याशिवाय धान्य उत्पादन नाही की उद्योगधंदे, कारखाने नाहीत. आपल्याकडे निसर्गचक्रानुसार पाऊस पडतो. काही ठिकाणी तर अतिवृष्टी होते. पण उन्हाळ्याचे शेवटचे दोन महिने पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. इतकी उठाठेव केल्यावरही मिळणारे पाणी शुद्ध असेलच याची खात्री देता येत नाही. हे टाळण्यासाठी आता पाण्याचे एटीएम ही नवी संकल्पना पुढे येत असून, याद्वारे १०० टक्के शुद्ध पाणी नागरिकांना पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पहिला प्रयोग नागलवाडीत
शहरातील नागरिकांना सध्या काही प्रमाणात शुद्ध पाणीपुरवठा होत असला तरी पाण्यात असणाऱ्या क्षारामुळे जडपणा येत आहे. मात्र आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत खासगी कंपन्यांच्या मदतीने शहरालगत अनेक भागात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे यंत्र ‘एटीएम’ लावण्यात येणार आहे. याची सुरुवात हिंगणा येथील नागलवाडी ग्रामपंचायतीपासून होणार आहे़
नागरिकांना मिळेल वॉटर कार्ड
नागरिकांना वॉटर कार्ड देण्यात येणार असून, मुबलक पिण्याचे पाणी ‘प्रीपेड सिस्टीम’ने वाजवी दरात उपलब्ध होणार आहे. टंचाईग्रस्त भागामध्ये प्रीपेड स्मार्टकार्ड सिस्टीमद्वारे पाणी पुरवण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांना केवळ २० पैसे प्रति लिटर शुद्ध पाणी पुरवण्यात येईल.
कार्ड स्वीप करा, पाणी मिळवा
वॉटर एटीएम पाणी पिण्यास लायक नसलेल्या बोअरवेल्सला अथवा पाण्याच्या टाकीला जोडण्यात येतील. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक अल्ट्रा फिल्टरेशन, नॅनो फिल्टरेशन, ओझोनिझेशन आदी प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. स्टोरेज युनिटमध्ये एकदा पाणी पडल्यास लोक कार्ड स्वीप करून पाणी मिळवू शकतील. जेवढे लिटर पाणी हवे आहे तेवढा आकडा मशिनवर टाकून कार्ड स्वीप करावे लागेल. एटीएम २४ तास अविरत सेवा देणार आहे. नागरिकांनी पाणी किती वेळा काढले तसेच त्यांच्या कार्डमधून पैशांचा व्यवहार होण्यासाठी सर्व्हरची व्यवस्था करण्यात आली आहे.
सौरऊर्जेवर चालेल एटीएम
ग्रामीण भागात विजेची समस्या आहे. त्यामुळे हे एटीएम यंत्र २४ तास चालण्यासाठी बॅटरी बॅकअपची सोय करण्यात आली आहे. या एटीएमच्या टाकीवर सोलर यंत्र लावण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला तरी नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होत राहील.
च्कंपनीच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी वॉटर एटीएमची सोय करून देतो. यासाठी ग्रामपंचायत सदस्यांचा पुढाकार हवा. जवळपास चार लाख प्रति युनिटला खर्च येतो. नागरिकांना २० पैशांत १ लिटर शुद्ध पाणी यातून उपलब्ध होते, असे वॉटर केअर टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण चरडे यांनी सांगितले.
नागरिकांना वॉटर कार्ड देण्यात येणार असून, मुबलक पिण्याचे पाणी ‘प्रीपेड सिस्टीम’ने वाजवी दरात उपलब्ध होणार आहे.