शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता उद्धव ठाकरेंना ‘हिंदूजननायक’ उपाधी; शिवसेना नेत्यानं पोस्ट केला बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 09:14 IST

आता शिवसेना नेते आणि माजी खासदाराने उद्धव ठाकरेंचा हिंदूजननायक म्हणून उल्लेख करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

मुंबई – हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण हिंदुत्व आणि हनुमान चालीसाभोवती फिरू लागले आहे. राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्व स्वीकारत मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावेत अशी मागणी केली. त्याला भाजपानेही पाठिंबा दिला. मात्र सत्ताधारी शिवसेनेने भाजपा-मनसेवर नकली हिंदुत्वाचा आरोप केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी(Raj Thackeray) हिंदुत्वाची भूमिका घेतल्यापासून त्यांच्या कार्यकर्त्यांनी हिंदूजननायक राज ठाकरे अशी उपाधी लावली. मनसेच्या अनेक पोस्टर्सवर हिंदूजननायक म्हणून राज ठाकरेंना पुढे करण्यात आले. मात्र आता शिवसेना नेते आणि माजी खासदाराने उद्धव ठाकरेंचा हिंदूजननायक म्हणून उल्लेख करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) हिंदूजननायक उल्लेख केला आहे. येत्या १४ मे रोजी मुंबईच्या बीकेसी मैदानात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. तत्पूर्वी पक्षाकडून टीझर, पोस्टर्स जास्तीत जास्त प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे.

अलीकडेच शिवसेनेच्या टीझरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेचा व्हिडीओ वापरण्यात आल्याचं समोर आलं होते. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विट करत म्हटलं  होतं की, असली नकली म्हणाऱ्यानी स्वतः चे आत्मपरीक्षण करा. काहीतरी अस्सल तुमचे असुद्या. इतके ही नकली होऊ नका. सभा शिवसेनेची आणि व्हिडिओमध्ये गर्दी मनसेच्या सभेची. अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का..? असा सवाल करत लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली हे नकली हिंदुत्ववादी आहेत असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला होता.

शिवसेनेची १४ मे रोजी सभा

१४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. “आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे. पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत,” असं उद्धव ठाकरे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते. दरम्यान, यानंतर शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी टीझर, पोस्टर्स प्रकाशित करणं सुरू केले आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे