आता उदयनराजेही करू लागले नकला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 18:39 IST2019-04-10T18:30:26+5:302019-04-10T18:39:56+5:30
उदयनराजे यांच्या स्टाईलकडे पाहिल्यास त्यांनी त्यांची स्टाईल आता बदलल्याचे दिसत आहे. उदयनराजे सध्या मोदी सरकारवर कडाडून टीका करत आहे. यामध्ये ते मोदींची नकल करत आहेत.

आता उदयनराजेही करू लागले नकला !
मुंबई - आपल्या बिनधास्त स्टाईलमुळे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असलेले सातारा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी अनेक वृत्त वाहिन्यांना मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतीत उदयनराजे यांनी स्वत: विषयी अनेक गुपीतं उघड केली. तसेच बिनधास्त बोलण्याने सोशल मीडियावरील आपल्या चाहत्यांमध्ये भरच घातली आहे. परंतु, याच उदयनराजे यांची स्टाईल आता बदललेली दिसत आहे.
उदयनराजे सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यासाठी ते सातारा जिल्ह्यातील गावे पिंजून काढत आहेत. परंतु, उदयनराजे यांच्या स्टाईलकडे पाहिल्यास त्यांनी त्यांची स्टाईल आता बदलल्याचे दिसत आहे. उदयनराजे सध्या मोदी सरकारवर कडाडून टीका करत आहे. यामध्ये ते मोदींची नकल करून दाखवत आहे. त्यामुळे सातारकरांना उदयनराजे यांचं वेगळ रूप पाहायला मिळत आहे.
उदयनराजे यांचे नुकतेच एक भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात ते मोदींची नकल करताना दिसत आहे. यावेळी उदयनराजे यांनी मोदींनी जाहीर केलेल्या नोटबंदीची देखील खिल्ली उडवली. उदयनराजे यांचे हे बदललेले रूप आता सातारकरांना पाहायला मिळाले आहे.