"...तोपर्यंत संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड जेल राहणार;" किरीट सोमय्यांनी केलं मोठं भाकीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 08:23 PM2022-08-08T20:23:56+5:302022-08-08T20:24:46+5:30

यापूर्वी न्यायालयाने संजय राऊतांना ईडीची कोठडी सुनावली होती. ती आज संपली. यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, यावेळी ईडीने राऊतांच्या चौकशीसाठी ईडी कोठडी मागितली नाही.

Now Sanjay Raut's stay will be Nawab Malik's neighbor in Arthur Road Jail | "...तोपर्यंत संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड जेल राहणार;" किरीट सोमय्यांनी केलं मोठं भाकीत 

"...तोपर्यंत संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड जेल राहणार;" किरीट सोमय्यांनी केलं मोठं भाकीत 

googlenewsNext


पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना आज सेशन कोर्टाने 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे आता त्यांचा पुढील मुक्काम हा मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात असणार आहे. येथेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुखही आहेत. यावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, आता संजय राऊतांचा मुक्काम नवाब मलीक यांचे शेजारी बनून आर्थर रोड जेलमध्ये राहणार, असे म्हणत मोठे भाकित केले आहे.

"आता संजय राऊतांचा मुक्काम नवाब मलीक यांचे शेजारी बनून आर्थर रोड जेलमध्ये राहणार. सध्या तर पत्रा चाळ घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. वसई 2000 कोटींचा पर्ल ग्रुप घोटाळा, दुबईमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये बिल्डर्स मंडळींसोबत बैठका, चीन दौरा... घोटाळ्यांची चौकशी होईपर्यंत संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड जेल रहणार, असे मला वाटते," असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

यापूर्वी न्यायालयाने संजय राऊतांना ईडीची कोठडी सुनावली होती. ती आज संपली. यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, यावेळी ईडीने राऊतांच्या चौकशीसाठी ईडी कोठडी मागितली नाही. यामुळे कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: Now Sanjay Raut's stay will be Nawab Malik's neighbor in Arthur Road Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.