शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पडळकरांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर आता दानवेंनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 11:09 IST

पडळकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आता पडळकरांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

ठळक मुद्देशरद पवार हे राज्याचे मोठे नेते आहेत. त्यांनी राज्यासाठी योगदान दिले आहेपडळकरांनी केलेलं विधान योग्य नाही. कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबाबत असे विधान करता कामा नयेपडळकरांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी भारतीय जनता पक्षाचा संबंध नाही

मुंबई - भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पडळकरांनी केलेल्या विधानाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आता पडळकरांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

गोपिचंद पडळकर यांच्या विधानाबाबत रावसाहेब दानवे म्हणाले की, शरद पवार हे राज्याचे मोठे नेते आहेत. त्यांनी राज्यासाठी योगदान दिले आहे. पडळकरांनी केलेलं विधान योग्य नाही. कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबाबत असे विधान करता कामा नये. पडळकरांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी भारतीय जनता पक्षाचा संबंध नाही. ते त्यांचं वैयक्तिक विधान आहे. याबाबत आमचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पडळकरांनीही आपण अनावधानाने हे विधान केल्याचे सांगत खेद व्यक्त केला आहे.

 शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असे विधान भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी केले होते. त्यानंतर त्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या विधानावरून आक्रमक भूमिका घेतल्यावर भाजपाने पडळकरांचे ते वक्तव्य वैयक्तिक विधान आहे, त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, असे सांगत हात झटकले होते. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही असे विधान करणे बरोबर नसल्याचे सांगितले होते.

दरम्यान, चीनसोबत निर्माण झालेल्या तणावावेळी काँग्रेसने विरोधाचे राजकारण न करता सरकारला पाठिंबा दिला पाहिजे. चीनने नेहरूंच्या काळातही हल्ला केला होता, आपण आपल्या देशाच्या लष्करावर विश्वास ठेवला पाहिजे. तसेच मोदी कुठल्याही देशाचे आक्रमण परतवून लावू शकतात, असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

चीनविरोधात सैन्य पाठवण्यामागे अमेरिकेचा हा आहे सुप्त हेतू, या ठिकाणांवरून परिस्थितीवर ठेवलीय नजर

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेSharad Pawarशरद पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरPoliticsराजकारण