शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
6
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
7
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
8
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
9
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
10
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
11
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
12
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
13
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
14
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
15
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
16
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
17
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
18
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
19
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
20
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

आता विधान परिषदेच्या ११ जागांकडे लक्ष

By यदू जोशी | Updated: June 13, 2018 05:34 IST

विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात निवडणूक होणार आहे.

 मुंबई : विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात निवडणूक होणार आहे. आपल्या पाच जागा निवडून येण्याच्या दृष्टीने भाजपा रणनीती आखत असून त्यासाठी ‘मित्र’पक्ष शिवसेनेची भाजपाला गरज भासणार आहे.राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त आणि शरद रणपिसे, भाजपाचे भाई गिरकर आणि विद्यमान मंत्री महादेव जानकर (रासपा), शिवसेनेचे अनिल परब व शेकापचे जयंत पाटील हे ११ सदस्य निवृत्त होत असल्याने ही निवडणूक होत आहे. ही निवडणूक नागपूर अधिवेशनात होणार असल्याने पावसाळ्यातही नागपुरातील राजकीय वातावरण गरम असेल.एक जागा निवडून आणण्यासाठी २७ आमदारांचा कोटा लागेल. भाजपाचे संख्याबळ १२३ (एक रासपा सदस्यासह) आहे. मात्र विधान परिषदेवर पाच उमेदवार निवडून द्यावयाचे असतील तर भाजपाला आणखी १२ मतांची गरज असेल. त्यात सहा अपक्ष विधानसभा सदस्य हे भाजपासोबत आहेत. त्यामुळे त्यांना आणखी सहा मतांची गरज भासेल.शिवसेनेचे ६३ विधानसभा सदस्य आहेत. त्यांचे दोन आमदार सहज निवडून येऊन त्यांच्याकडे ९ मते शिल्लक असतील. ही मते जर शिवसेनेने भाजपाच्या पारड्यात टाकली तर भाजपाचा पाचवा आमदार निश्चितपणे निवडून येईल. शेकापचे जयंत पाटील यांची नजर शिवसेनेकडील जादा मतांवर असेल. स्वत:च्या पक्षाचे तीन, बहुजन विकास आघाडीचे तीन, माकपा, भारिप-बहुजन महासंघ आणि समाजवादी पार्टीच्या एका विधानसभा सदस्याचे समर्थन मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या शिवाय काही अपक्षांनाही ते गळाशी लावू शकतात.काँग्रेसचे ४२ आणि राष्ट्रवादीचे ४१ मिळून ८३ विधानसभा सदस्य आहेत. दोघांनी आघाडी करून निवडणूक लढली तर त्यांच्या तीन जागा निश्चितपणे येतील. तीन जागा जिंकण्यासाठी त्यांना ८१ आमदार लागतील आणि अशाप्रकारे त्यांच्याकडे दोन मते शिल्लक राहतील. विधानपरिषदेच्या दोन जागा काँग्रेसच्या तर एक राष्ट्रवादीच्या वाट्याला जाईल, असे म्हटले जाते. आघाडीकडे शिल्लक असलेली दोन मते आपल्याला मिळावित असा जयंत पाटील यांचा प्रयत्न असेल.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाPoliticsराजकारण