शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुखांच्या कंपन्यांनी घेतलेल्या कर्जाकडे ईडीचा मोर्चा, नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 11:24 IST

 देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या विविध कंपन्यांसाठी ही कर्जे उचलण्यात आली आहेत. मात्र, त्यापैकी बहुतांश कंपन्या या केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जमीर काझी -मुंबई : गेल्या साडेतीन, चार महिन्यांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहाराची शहानिशा करणारे सक्तवसुली संचालनालय (ईडी) आता त्यांनी विविध बँकांतून घेतलेल्या कर्जाची सूक्ष्म तपासणी सुरू करत आहे.  देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या विविध कंपन्यांसाठी ही कर्जे उचलण्यात आली आहेत. मात्र, त्यापैकी बहुतांश कंपन्या या केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांनी अनियमितपणे या शेल कंपन्यांसाठी कर्ज दिल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याबाबत प्राधान्याने माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.आतापर्यंतच्या ईडीच्या तपासात देशमुख यांनी खासगी बँकांकडून अनेक असुरक्षित कर्जे घेतल्याचे आढळले आहे. ती मंजूर करताना नियमांचे उल्लंघन केले गेले असून, कर्जाचे पैसे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीच्या कंपन्यांकडे वर्ग करण्यात आले असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. तसेच या कंपन्यांपैकी, ज्यांना कर्ज वाटप झाले त्यापैकी अनेक कंपन्या केवळ कागदावरच आहेत. त्यामुळे देशमुख यांनी किती बँकांकडून किती कर्ज घेतले होते, त्याची रक्कम किती होती, याचा ईडी तपास करीत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

ईडीने आतापर्यंत देशमुख यांना चौकशीसाठी ४ वेळा, तर त्यांचे पुत्र ऋषिकेश व पत्नी आरती यांना अनुक्रमे दोन व एक वेळा चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले. मात्र, हे चौकशीला हजर राहिलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतरच चौकशीला सामोरे जाऊ, असे अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे.

वादग्रस्त आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी मुंबईच्या आयुक्त पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर २० मार्चला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून १०० कोटी हप्ता वसुलीचा त्यांच्यावर आरोप केला. त्याबाबत सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने देशमुख यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण