"Now don't inquire next week," Pratap Saranaik's request to the ED | "आता नको पुढच्या आठवड्यात करा चौकशी,’’ प्रताप सरनाईक यांची ईडीला विनंती

"आता नको पुढच्या आठवड्यात करा चौकशी,’’ प्रताप सरनाईक यांची ईडीला विनंती

ठळक मुद्देशिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कालपासून ईडीने सुरू केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्राचे राजकारणा ढवळून निघाले आहेचौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी ईडीला केली विनंतीआता नको तर पुढच्या आठवड्यात आपली एकत्रित चौकशी करावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली आहे

ठाणे - शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कालपासून ईडीने सुरू केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्राचे राजकारणा ढवळून निघाले आहे. दरम्यान, ईडीच्या धाडींमुळे माझे तोंड बंद होणार नाही, असे आव्हान देत प्रताप सरनाईक यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता. मात्र ईडीने आज चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी ईडीला विनंती केली आहे. आता नको तर पुढच्या आठवड्यात आपली एकत्रित चौकशी करावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

सध्या मी कोविड-१९ नियमानुसार क्वारेंटाईन आहे. त्यामुळे आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही. तसेच विहंग सरनाईक यांची पत्नीही आजारी आहेत. त्यामुळे दोघांचीही पुढच्या आठवड्यात चौकशी करण्यात यावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केल्याचे वृत्त आहे. ईडीने प्रताप सरनाईक यांना समन्स बजावून आज सकाळी ११ वातजा चौकशीसाठी बोलावले होते. 

प्रताप सरनाईक बाहेरुन आल्यामुळे क्वॉरंटाईन होणार असल्यामुळे आज ईडी कार्यालयात हजर राहता येणार नाही, पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी बोलवावे अशा विनंतीचे पत्र ईडीला देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रताप सरनाईक यांचे मेहुणे याबाबतचे पत्र घेऊन ईडी कार्यालयात येणार आहेत, असेही सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, ईडीच्या चौकशीनंतरही प्रताप सरनाईक यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता.  ईडीनं धाड टाकली म्हणून तोंड बंद करणार नाही. फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं, होतं. ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना रणौत यांच्यावर हक्कभंग दाखल केला, अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्याची मागणी लावून धरली, त्याच दिवशी उद्या काय होणार याचा विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी मला आमदार केलं. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणं, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणं ही माझी जबाबदारी असल्याचं सरनाईक म्हणाले.

ईडीचे लोक माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचं विचारत होते, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. 'या देशात, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणार. ईडीचे छापे पडले म्हणून प्रताप सरनाईकचं तोंड बंद होणार नाही. महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे,' अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली होती. 

'ईडीच्या लोकांनी माझं कार्यालय, घरी सगळीकडे चौकशी केली, कागदपत्रं ताब्यात घेतली. मी गेल्या ३० वर्षांपासून बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात आहे. त्याची सर्व कागदपत्रं आहेत. ईडीच्या लोकांना माझे कर्मचारी, मुलं यांनी माहिती दिली आहे. मात्र त्यानंही त्यांचं समाधान झालेलं नाही. मला चौकशीला बोलावल्यास त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास मी समर्थ आहे', असं प्रताप सरनाईक म्हणाले होते. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: "Now don't inquire next week," Pratap Saranaik's request to the ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.