शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

स्पेशल स्टोरी : गायीच्या पोटात अडकलेल्या वासराचा होणार सुलभ जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 07:00 IST

गायी-म्हशींच्या प्रसुतीवेळी अनेकदा त्यांचे पिल्लू पोटात अडकते व त्यांना काढताना त्यांचा मृत्यू होतो.

ठळक मुद्देशिर्सुफळच्या शुभम जाधवने तयार केले ‘काल्फ एक्सट्रॉक्टिंग मशीन : भारत सरकाचे पेटंट 

- समिर बनकर-  बारामती : गायी-म्हशींच्या प्रसुतीवेळी अनेकदा त्यांचे पिल्लू पोटात अडकते व त्यांना काढताना त्यांचा मृत्यू होतो. मात्र, अशा वासरांना आता यापुढे सुलभ बाहेर काढत जीवदान मिळणार आहे.. बारामती तालुक्यात  शिर्सुफळ येथील तरुणाने '' काल्फ एक्स्टॅक्टींग'' या अद्ययावत मशिनचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे भारतात अशा प्रकारचे यंत्र बनविण्याचा विक्रमच त्यांच्या नावावर झाला असून भारत सरकारकडून त्याला या यंत्राचे पेटेंट देखील मिळाले आहे. या यंत्राच्या शोधामुळे गायी-म्हशींच्या पोटात अडकलेल्या वासरू-रेडकू सहज बाहेर काढता येणार असून त्यांचा मृत्यू टाळता येऊ शकणार आहे. शुभम राजेंद्र जाधव असे या संशोधक विद्यार्थ्याचे नाव आहे. माळेगाव येथील पशूसंवर्धन महाविद्यालयात शिकणाऱ्या शुभमच्या ‘काल्फ एक्सट्रॉक्टिंग मशीन’साठी भारत सरकारकडून १८ फेब्रुवारीला पेटंट जाहीर केले होते.  बुधवारी (दि. १५ मे) त्याला पेटंटचे प्रमाणपत्र देखील मिळाले. गाई म्हशीच्या प्रस्तुती दरम्यान वासरे अडकण्याचा प्रकार नेहमीच पाहायला मिळतो या प्रकारात गाई म्हशी किंवा त्यांची वासरे मृत होण्याची शक्यता असते.  याला पशुवैद्यकीय भाषेत ‘डिस्टोशिया’ असे म्हटले जाते. साधारणपणे अशा परिस्थितीत अडकलेले वासरू माणसांच्या सहाय्याने ओढले जाते. परंतू यावेळी गायी -म्हशीच्या गर्भाशयाला इजा पोहोचू शकते. सध्या विदेशी वंशाच्या गाईमध्ये डिस्टोशिया प्रकार नेहमीच पाहायला मिळतो.म्हणून पशुधन वाचविण्यासाठी आणि प्रसुती सुखकर करण्यासाठी हे मशीन शोधण्यात आले आहे. हे मशीन वासरू ओढण्याचे काम करते. ज्यामुळे गायी-म्हशीला कसल्याही प्रकारची इजा पोहचत नाही. होणारी वासरे सुद्धा सुखरूपपणे जन्म घेतात, अशा प्रकारचे यंत्र भारतात प्रथमच शोधण्यात आले आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देखील आर्वजून या यंत्राची पाहणी करत उत्तम संशोधनाबद्दल त्याला शाब्बासकीची थाप दिली.  शुभमच्या या संशोधनाच्या माध्यमातून माळेगाव येथील पशूसंवर्धन महाविद्यालयाला हे पहिलेच पेटंट मिळाले आहे. कृषी विज्ञान केंद्रामध्ये झालेल्या कृषी प्रदर्शनामध्ये या यंत्राचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवले होते. या यंत्राबाबत गावागावातील डेअरी फार्मवर जाऊन माहिती देण्यात येणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी या यंत्राबद्दल माहिती घेऊन हे यंत्र वापरणार असल्याचे सांगितले. --* यंत्राव्दारे १.१८ मिनिटात होते प्रसुतीया यंत्राद्वारे पशूसंवर्धन महाविद्यालयातील १० गाईंची प्रसुती केली आहे. गाई-म्हशींची पोटात वासरू अडकले तर त्याला यंत्राच्या सहाय्याने अशा गाई-म्हशींची प्रसुती अवघ्या १.१८ मिनिटात होते. पूर्वी पटोत अडकलेले वासरु हाताने ओढून काढले जायचे. त्या प्रक्रियेत प्रसुती होण्यास सुमारे अर्धातासापेक्षाही अधिक वेळ लागतो. त्यामुळे जनावरांना इजा होण्याचाही मोठा धोका असतो. --------------------------

टॅग्स :PuneपुणेcowगायFarmerशेतकरीagricultureशेती