शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

महामंडळाच्या १४ संचालकांना नोटिसा

By admin | Published: February 08, 2016 4:36 AM

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दाखल केलेल्या दाव्याला अनुसरून कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने महामंडळाच्या विद्यमान १४ संचालकांविरोधात

संदीप आडनाईक,   कोल्हापूरअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दाखल केलेल्या दाव्याला अनुसरून कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने महामंडळाच्या विद्यमान १४ संचालकांविरोधात नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. काही संचालकांना याबाबतच्या नोटिसा मिळाल्या आहेत. कोल्हापुरात १0 जानेवारी २0१६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सध्याचे प्रभारी अध्यक्ष विजय पाटकर यांच्यासह १४ संचालकांच्या उपस्थितीत झालेल्या द्वैवार्षिक सभा झाली होती. या सभेत विविध विषयांवर चर्चा न करताच ते विषय मंजूर केल्याच्या विरोधात महामंडळाचे माजी अध्यक्ष भास्कर जाधव, प्रमोद शिंदे, विजय शिंदे आणि रणजीत जाधव या सभासदांनी धर्मादाय आयुक्तांकडे दि. १४ जानेवारी रोजी दावा दाखल केला आहे. त्याच्या आधारे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून सर्व १४ संचालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी भास्कर जाधव यांच्यासह चौघांमार्फतही सर्व संचालकांना महामंडळाच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत भाग न घेण्याबाबतच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसीनुसार महांमडळावर ६ जानेवारी २0१६ रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झालेल्या ठरावाप्रमाणे धर्मादाय आयुक्तांमार्फत प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी, त्यांच्यामार्फत संस्थेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी व्हावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. त्याच्या आधारे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी ६ जून २0१३ रोजी महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी या मागणीसाठी मेघराजराजे भोसले, सुरेंद्र पन्हाळकर आणि अर्जुन नलावडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे दावा दाखल केला होता.भास्कर जाधव यांच्यासह चार सभासदांच्या वकिलांनी पाठविलेली या संदर्भातील नोटीस मिळाल्याचे महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय कोंडके यांनी सांगितले. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मात्र, कोणतीही नोटीस आपल्याला आली नसल्याचे कोंडके यांनी सांगितले. महामंडळाच्या गैरकारभारावर यापूर्वीही दावे दाखल करण्यात आले होते; परंतु ते दावे आयुक्त कार्यालयाकडून पुढे चालू राहिले नाहीत. यापूर्वीचे दावे हे कृती समितीने दाखल केले होते; परंतु या वेळी आम्ही चार सभासदांनी हे दावे दाखल केले आहेत. लवकरच महामंडळाची निवडणूक लागेल.- भास्कर जाधव, माजी अध्यक्ष, मराठी चित्रपट महामंडळ