शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १,२६३ शिक्षकांना नोटीस

By admin | Updated: June 23, 2016 17:26 IST

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील १ हजार २६३ शिक्षकांवर फौजदारी कारवाई करण्याची नोटीस शिक्षण आयुक्तांनी बजावली आहे.

ऑनलाइन लोकमत,

मुंबई, दि. 23 - राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील १ हजार २६३ शिक्षकांवर फौजदारी कारवाई करण्याची नोटीस शिक्षण आयुक्तांनी बजावली आहे. मात्र काहीही चुक नसताना अशाप्रकारे नोटीस बजावणे बेकायदेशीर आहे, असा दावा मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केला आहे. संघटनेने गुरूवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन करत या कारवाईचा विरोध केला आहे.संघटनेचे सरचिटणीस प्रा. अनिल देशमुख म्हणाले की, जून महिन्यात सुट्टीच्या कालावधीत काही शिक्षकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे जून महिन्यात नोटीस देताना त्याचे उत्तर ३१ मे २०१६पर्यंत देण्याचे आदेश आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मुळात शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या गोंधळाच्या परिस्थितीत सर्व संचालकांमध्ये समन्वय साधण्यासाठी आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. मात्र तो हेतु साध्य न होता, आयुक्तांमुळे गोंधळात आणखी भर पडली आहे, असा आरोप देशमुख यांनी लावला आहे.मुंबई विभागातील २२२ शिक्षकांना फौजदारी कारवाईच्या नोटीस आलेल्या आहेत. मुळात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे, म्हणजेच न्यायालयाचा अवमान असल्याचा दावा शिक्षक संघटनेने केला आहे. परिणामी आयुक्तांनी केलेल्या कारवाईच्या हेतुविषयी संघटनेने शंका निर्माण केलेली आहे. शिवाय या कारवाईची चौकशी करून आयुक्त पद रद्द करण्याची गंभीर मागणी संघटनेने केली आहे.अधिकारी मंत्र्यांचे ऐकत नाही का?याआधी चार महिन्यांपूर्वी शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन केले होते. त्यावेळी २२ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी बैठक घेऊन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एका महिन्यांत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र बैठकीला चार महिने उलटूनही मागण्यांवर अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत वारंवार संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांनाआणि मंत्री महोदयांना भेटून स्मरणपत्रेही दिली आहेत. त्यामुळे अधिकारी मंत्र्यांचे ऐकत नाही का? असा सवाल शिक्षक संघटनेने उपस्थित केला आहे. तावडे यांनी मान्य केलेल्या मागण्यांवर तातडीने अंमलबजावणी झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.