शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

राणेंच्या विरोधात अराजकीय व्यक्ती?, दोन्ही काँग्रेसची खलबते

By अतुल कुलकर्णी | Published: November 22, 2017 5:49 AM

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांच्याविरोधात अराजकीय, अभ्यासू आणि सामाजिक प्रतिष्ठा असणारी व्यक्ती उभी करावी, असा सूर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत निघाल्याची माहिती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांच्याविरोधात अराजकीय, अभ्यासू आणि सामाजिक प्रतिष्ठा असणारी व्यक्ती उभी करावी, असा सूर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत निघाल्याची माहिती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.७ डिसेंबर रोजी होणा-या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत कोणाला उभे करायचे, यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त बैठकीत विचारमंथन झाले. काँग्रेस पक्ष सोडताना राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. रिक्त झालेली ही जागा काँग्रेसची आहे, त्यामुळे तेथे काँग्रेसने उमेदवार उभा केल्यास त्याला राष्टÑवादीचा पाठिंबा राहील, असे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बैठकीत सांगितले. तसेच दोघांच्या सहमतीने एक उमेदवार उभा करावा व त्यासाठी शिवसेनेचे समर्थन मिळेल काय यासाठी प्रयत्न करावेत, अशीही चर्चा बैठकीत झाली. मात्र शिवसेना आज जरी राणेंच्या विरोधात बोलत असली तरी आपल्या भूमिकेवर कायम राहील की नाही, याविषयी काही नेत्यांनी साशंकता व्यक्त केली.अर्ज दाखल करण्याची शेवटीची तारीख २७ नोव्हेंबर आहे. तोपर्यंत आणखी दोन ते तीन बैठका होतील. त्यानंतर जे ठरेल त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असेही विखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्टÑवादीचे नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, शरद रणपिसे आदींची उपस्थिती होती.दरम्यान, भाजपा पक्ष कार्यालयातून उमेदवारी अर्ज नेण्यात आला आहे. मंगळवारी नारायण राणे विधानभवनात येऊन गेले. एक चर्चा अशीही आहे की राणे यांना मंत्री करायचे आणि आता घटक पक्षाचे सदस्य मंत्री आहेत म्हणून त्यांना आम्ही मतदान केले, असे सांगून राणे यांना भाजपाने मतदान करायचे, त्याचवेळी शिवसेनेने मतदान केले तर चांगलेच, नाही तर त्यांची मते फोडायची. या रणनीतीची चर्चा चालू असली तरी त्यावर अधिकृतपणे कोणीही बोलायला तयार नाही.>शायना एन.सी. यांचेही नाव चर्चेत : राणे यांना विधान परिषदेवर निवडून आणायचे की त्या जागी भाजपातून शायना एन.सी. किंवा माधव भांडारी यांच्यापैकी एकाला संधी द्यायची यावर भाजपात चाचपणी सुरू आहे. शिवसेना शायना एन.सी. यांच्या नावाला होकार देईल असे सांगितले जात आहे. मात्र भाजपातून यावर कोणीही अधिकृतपणे बोलायला तयार नाही. सगळ्यांची बोटं मुख्यमंत्र्यांच्या दिशेने आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकNarayan Raneनारायण राणे