सुविधा देण्यात रेल्वे ‘नापास’

By Admin | Updated: August 1, 2016 04:47 IST2016-08-01T04:47:12+5:302016-08-01T04:47:12+5:30

लोकलचे वेळापत्रक सुधारण्यात आणि सुविधा देण्यात उपनगरीय रेल्वे यंत्रणा अपयशी ठरत आहे.

'No' to Railways | सुविधा देण्यात रेल्वे ‘नापास’

सुविधा देण्यात रेल्वे ‘नापास’

सुशांत मोरे,

मुंबई- लोकलचे वेळापत्रक सुधारण्यात आणि सुविधा देण्यात उपनगरीय रेल्वे यंत्रणा अपयशी ठरत आहे. त्याचे पडसाद प्रवाशांच्या आंदोलनांतून उमटत आहेत, असे ताशेरे कॅगच्या (नियंत्रक व महा लेखापरीक्षक) अहवालातून उपनगरीय रेल्वे यंत्रणांवर ओढण्यात आले आहेत. देशभरातील उपनगरीय रेल्वेच्या कामगिरीची माहिती घेऊन त्याचा अहवाल ‘कॅग’कडून तयार करण्यात आला. हा अहवाल नुकताच संसदेसमोर ठेवण्यात आला. त्यातून ही माहिती समोर आली. महत्वाची बाब म्हणजे २0१0 ते २0१५ या काळात देशभरातील एकूण आंदोलनांपैकी मुंबईतील मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवर २८ तर पश्चिम रेल्वेवर १७ विविध आंदोलने झाली आहेत.
उपनगरीय रेल्वे सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र सुविधांची व वक्तशीरपणाची कमतरता, त्यामुळे विस्कळीत होत असलेली उपनगरीय सेवा पाहता त्याचा परिणाम प्रवास करणाऱ्या लाखो उपनगरीय प्रवाशांवर होत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येत असून त्याचा फटका रेल्वेच्या मालमत्तांना बसत असल्याचे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सेवा आणि कार्यक्षमता याबाबत उपनगरीय रेल्वे यंत्रणेला वेळोवेळी सूचना प्राप्त झाल्या आहेत.
देशभरातील उपनगरीय सेवा असलेल्या सात क्षेत्रीय रेल्वेच्या सूचनांची माहीती घेतली असता २0१0 ते २0१५ पर्यंत तब्बल १३ हजार २६0 महत्वाच्या विविध तक्रारी रेल्वेकडे प्राप्त झाल्या आहेत.
सर्वाधिक तक्रारी मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील आहेत. मध्य रेल्वेवरील सात हजार तक्रारी असून यात स्थानकांवर कमी दर्जाच्या सुविधा असल्याबाबतच्या ४ हजार ४२२ तक्रारींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पश्चिम उपनगरीय रेल्वेवरीलही ३ हजार ४२१ तक्रारी प्राप्त झाल्या असून यात लोकलमधील सुविधांबाबतच्या सर्वाधिक ५६६ तक्रारी असल्याचे नमूद आहे. २0१0 ते २0१५ या काळात देशभरातील उपनगरीय स्थानकांवर ३४८ आंदोलने झाली असून यामध्ये मध्य रेल्वेवर २८ तर पश्चिम रेल्वेवर १७ आंदोलनाचा समावेश असल्याचे कॅगच्या अहवालातून समोर आले आहे. (प्रतिनिधी)
मालमत्तेचे २0१0 ते २0१५ या काळात
५७ लाख १९ हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे.
मध्य रेल्वे- ४८ लाख ५0 हजार रुपये
पूर्व रेल्वे- ४ लाख ३४ हजार
दक्षिण मध्य रेल्वे- ३ लाख ९९ हजार
दक्षिण रेल्वे- ३६ हजार

Web Title: 'No' to Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.