शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

राज ठाकरेंना मोठा दिलासा! १६ वर्षांपूर्वीचा खटला रद्द, पुरावा नसल्याचे हायकोर्टाचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 16:38 IST

MNS Raj Thackeray News: राज ठाकरेंवरील आरोप निराधार असून, पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने खटला रद्द केल्याचे सांगितले जात आहे.

MNS Raj Thackeray News: एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे १६ वर्षे जुन्या खटल्यातून राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे वृत्त आहे. राज ठाकरे यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले आहे. 

१६ वर्षे जुन्या खटल्यातील दोषमुक्तीचा अर्ज फेटाळणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला राज ठाकरे यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. या आव्हान याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. काही महत्त्वाच्या बाबींची नोंद घेण्यात कनिष्ठ न्यायालय अपयशी ठरले आहे आणि राज ठाकरे यांनी या खटल्यातून दोषमुक्त करावे, यासाठी केलेली विनंती नाकारण्यात चूक केली आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. 

२१ ऑक्टोबर २००८ रोजी तत्कालीन उस्मानाबाद आताचे धाराशीव जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांवर एसटीच्या बसवर दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. सन २००८ मध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशातील परप्रांतीय कामगारांनी महाराष्ट्रातील लोकांच्या नोकऱ्या हिरावल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. मुंबईत रेल्वे प्रवेश परीक्षेला बसलेल्या काही उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. 

दरम्यान, या प्रकरणातील दोषमुक्तीसाठी राज ठाकरे यांनी याचिका दाखल केली होती. कनिष्ठ न्यायालयाने ती फेटाळून लावली. राज ठाकरे यांची बाजू मांडणारे वकील राजेंद्र शिरोडकर आणि सयाजी नांगरे यांनी, ही कथित घटना घडली तेव्हा नेते घटनास्थळी नव्हते, अशी भूमिका मांडली. राज ठाकरे यांचे कथित प्रक्षोभक भाषण फिर्यादीने रेकॉर्डवर ठेवलेले नाही. आरोपपत्रातही ते जोडलेले नाही. त्यामुळे प्रक्षोभक भाषण केले असे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. सर्व साक्षी, पुरावे पाहिल्यानंतर खंडपीठाने राज ठाकरे यांच्या कथित चिथावणीखोर भाषण आणि चिथावणी देण्याबाबत कोणताही पुरावा नसल्याचे निरीक्षण नोंदवत खटला रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMumbai High Courtमुंबई हायकोर्टAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठMNSमनसे