...असे वक्तव्य कोणीही करू नये; भुजबळ-जरांगे वादावर अजित पवारांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 05:29 PM2023-11-26T17:29:00+5:302023-11-26T17:30:20+5:30

मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि पवारांचेच मंत्री छगन भुजबळ यांच्यात हमरीतुमरी सुरु झाल्याने अखेर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

...No one should make such a statement; Ajit Pawar's advice on Bhujbal-Jarange dispute on Maratha OBC Reservation | ...असे वक्तव्य कोणीही करू नये; भुजबळ-जरांगे वादावर अजित पवारांचा सल्ला

...असे वक्तव्य कोणीही करू नये; भुजबळ-जरांगे वादावर अजित पवारांचा सल्ला

गेल्या महिनाभरापासून राज्यातील राजकारण आणि तापलेल्या विषयांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे लांब राहिले होते. परंतू, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि पवारांचेच मंत्री छगन भुजबळ यांच्यात हमरीतुमरी सुरु झाल्याने अखेर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी आज बारामतीमध्ये जनता दरबार घेतला. मधल्या काळात लोकांना भेटता आलं नाही, असे म्हटलेय.

मिलेट व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट एक फूड इनक्यूबेशन सेंटर एक प्रकल्प बारामतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची मान्यता दिल्यानंतर सोलापूरमध्ये अशी माहिती देण्यात आली की, तिकडचा प्रकल्प बारामतीत आणला. पण तिकडचा प्रकल्प इकडे आणला नाहीय. राज्यात काम करीत असताना मतदारसंघातील तसेच सगळ्यांची कामे झाली पाहिजेत.  40 दुष्काळी तालुक्यात बारामतीचा समावेश झाला आहे, समावेश केला नाही. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जे काही सवलती दिल्या जातात त्या मिळतील, असेही पवार म्हणाले. 

 जे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झालेले आहेत, त्यांचा केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. किती निधी मागवला आहे हे आत्ताच मी सांगणार नाही.  ज्यावेळेस सरकारची मदत मिळेल त्यावेळेस मी सांगेन. पण ज्या ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, त्या ठिकाणी राज्य सरकारला खर्च करावा लागेल आणि त्याचा खर्च उचलायची राज्य सरकारची तयारी आहे, असेही पवार म्हणाले. 

सुसंस्कृत महाराष्ट्राची घडी यशवंतराव चव्हाण यांनी बसवली. त्या पद्धतीने अनेक जणांनी महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले. अनेक जण वेगवेगळे वक्तव्य करीत आहेत. त्यांना तो अधिकार घटनेने दिला आहे. पण आता विकासाचे प्रश्न बाजूला राहत आहेत. पण समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करू नये. प्रत्येकाने आपआपली भूमिका मांडावी, असा सल्ला पवारांनी भुजबळांच्या सभेवर दिला. 

Web Title: ...No one should make such a statement; Ajit Pawar's advice on Bhujbal-Jarange dispute on Maratha OBC Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.