शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

माझा माणूस पोलीस दलात त्या पदी आला पाहिजे हे प्रत्येक राजकीय पक्षानं केलं : मीरा बोरवणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 13:30 IST

काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकला होता. 

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकला होता. पोलिसींग संपलं, महाराष्ट्रानं केरळ, तेलंगणकडून शिकावं, बोरवणकर यांचा सल्ला

काही दिवसांपूर्वीच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक लेटरबॉम्ब टाकला होता. यामध्ये त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी रूपये दरमहा जमा करण्यास सांगितले होते असा दावा केला होता. यानंतर सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. आता याच पार्श्वभूमीवर माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. माझा माणूस पोलीस दलात त्या पदी आला पाहिजे हे प्रत्येक राजकीय पक्षानं आजवर केलं आहे, असं वक्तव्य माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलं आहे. 

"माझ्या कारकिर्दीत शंकरराव चव्हाण असेपर्यंत अॅडमिनिस्ट्रेशन खाली गेलं नव्हतं आणि मध्ये सुद्धा प्रामाणिक गृहमंत्री आले आहेत. पण सामान्यपणे कोणताही राजकीय पक्ष असू दे पोलिसांकडून वैयक्तिक किंवा पक्षाचं काम करून घेण्यावरच भर होता. आपले लोक कोणतीही पक्ष असो ती व्यक्ती प्रोफेशनल आहे किंवा नाही यावर न जाता माझा माणूस पदावर आला पाहिजे हा विचार होता. करप्शन, पॉलिटिक पॅट्रेनेच प्रत्येक राजकीय पक्षानं केलं आहे," असंही बोरवणकर म्हणाल्या. त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. 

"काही राजकीय नेत्यांनी येरवडा पोलीस स्टेशनची जी जागा होती त्यावर समिती स्थापन केली होती. आता येरवडा पोलीस स्थानक मध्यावर आलं आहे. त्यावेळी ते एका बाजूला होतं. म्हणजे २ एकर जागा आणि अन्य जमीन हे सोनं होतं. ते काही खासगी लोकांना देण्याचं ठरवलं होतं. त्यावेळी मी ती जागा देणार नसल्याचं म्हटलं. आपण त्या ठिकाणी पोलीस क्वार्टर किंवा पोलीस कार्यालय उभं करू शकतो असा विचार केला होता. कारण एकदा जागा दिली की ती पुन्हा मिळणार नाही. जेव्हा मी ती जागा दिली नाही तेव्हा त्यावेळच्या मंत्र्य़ांनी टीव्हीवर येऊन आम्हाला त्या कमिशनरांचं काहीतरी करावं लागेल असं सांगितलं होतं," असा एक किस्साही त्यांनी सांगितला. असं अनेकदाही झालं की आम्ही सल्ला दिला आणि मंत्र्यांनी कामही केलं. असे दोन्ही अनुभव आम्हाला आले असंही त्या म्हणाल्या. पोलीस दलात जात आणि विचारधारेवर आधारीत पोलीस अधिकारी आहेत. ते त्याप्रमाणेच वागत आहेत. तेदेखील बदलण्याची आवश्यकता असल्याचं बोरवणकर यांनी सांगितलं.  एका अधिकाऱ्यामुळे संपूर्ण पोलीस दलाचं नाव खराब करू नयेकाही पोलीस किंवा अधिकारी चुकीचं काम करतात म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पोलीस चुकीचं काम करतात असा समज चुकीचा आहे. काही दिवसांपूर्वीच बाहेरच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं आम्ही तर मुंबई पोलिसांना स्कॉटलंड पोलीस म्हणून पाहायचो पण तुमचे हे हाल झाले. हे ऐकून दु:ख झालं. एका अधिकाऱ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पोलीसांचं नाव खराब करू नये, असंही सचिन वझेंच्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या. आपल्याला ज्यातून बाहेर पडायचं आहे त्यावर आपण दोष देत न बसता त्यावरील उपाय शोधले पाहिजेत, असंही त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुखsachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंग