शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

ना चित्रपटांची नावे, ना नेत्यांची, त्याने आपल्या रिक्षावर लिहिलं ‘चांद्रयान-२’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 10:43 IST

शास्त्रज्ञांचा अभिमान : यानाशी संपर्क होण्याची अशोक नागभुजंगे यांना आशा

ठळक मुद्देगगनयान ही भारताची एक अंतराळ मोहीमया मोहिमेद्वारे भारतीय अंतराळवीर अवकाशात राहणार सोलापूरकरांना चांद्रयान-२ या मोहिमेविषयी आकर्षण

सोलापूर : अनेकदा शहरातील रिक्षांवर लिहिलेला मजकूर आपले लक्ष वेधून घेत असतो. शेरोशायरी, चित्रपटांची नावे, अण्णा-दादांची नावे, फॅन आॅफ दी, अभिनेत्यांची नावे देखील लिहिलेली असतात. आपल्या देशाचा अभिमान असलेला एखादा मजकूर लिहिलेली रिक्षा सहसा दिसत नाही. मात्र, अशोक नागभुजंगे यांची रिक्षा याला एक अपवाद ठरत आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांच्या प्रयत्नाला सलाम करावा, यासाठी रिक्षावर चांद्रयान-२ असे लिहिल्याचे रिक्षाचालक नागभुजंगे यांनी सांगितले.

अशोक नागभुजंगे यांचा मुलगा आठवीमध्ये शिकतो. वृत्तपत्र, दूरचित्रवाणी आणि शाळेमधून त्याला चांद्रयानाची माहिती मिळाली. त्याने आपल्या वडिलांना रिक्षावर चांद्रयान-२ लिहा, असे सांगितले. अशोक नागभुजंगे यांना रिक्षावर इतर क ाहीतरी लिहिण्याची इच्छा नव्हती. वृत्तपत्रातून त्यांना चांद्रयानाची माहिती आधीच मिळाली होती. आपले शास्त्रज्ञ चांद्रयान-२ मोहीम राबविण्यासाठी दिवस-रात्र कष्ट घेत आहेत. त्यांच्या कष्टाप्रति आदरभाव म्हणून तसेच आपल्या मुलाची इच्छा म्हणून त्याने चांद्रयान-२ असे आपल्या रिक्षावर लिहिले. 

७ सप्टेंबर, २०१९ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार १:५२ वाजता हे चांद्रयान उतरत असताना चंद्रतलापासून २,१०० मीटर उंचीवर होते, त्यावेळी यानाशी संपर्क तुटला. हे यान कोसळले असल्याची शक्यता आहे. ‘इस्त्रो’ची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या ‘चांद्रयान-२’च्या अखेरच्या टप्प्यात चांद्रभूमीपासून केवळ २.१ कि.मी. उंचीवर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने देशभरातील खगोलप्रेमींना आणि भारतीय शास्त्रज्ञांना धक्का बसला. यामुळे अशोक  नागभुजंगे यांना देखील वाईट वाटले. मात्र ते अजूनही आशावादी आहेत.

‘चांद्रयान-२’चे सोलापूरकरांना आकर्षण- गगनयान ही भारताची एक अंतराळ मोहीम आहे. ही मोहीम इस्रोतर्फे राबविली जात आहे. या मोहिमेद्वारे भारतीय अंतराळवीर अवकाशात राहणार आहेत. ही मोहीम तीन ते चार वर्षात पूर्ण होणार आहे. यासाठी सरकारने पैशांची तरतूद केली असल्याचे अशोक नागभुजंगे यांनी सांगितले. एकूणच सोलापूरकरांना चांद्रयान-२ या मोहिमेविषयी आकर्षण आहे. गणेशोत्सव व नवरात्रीमध्येही काही मंडळांनी ‘चांद्रयान-२’चा देखावा साकारला होता. दसºयाच्या मिरवणुकीत शाहीर वस्ती येथील जागृती नवरात्र महोत्सव मंडळाने चांद्रयान-२ व क्षेपणास्त्राचा देखावा सादर केला होता.

चांद्रयान पूर्णपणे अयशस्वी झाले, असे मला वाटत नाही. आपल्या देशातील शास्त्रज्ञांचे कष्ट वाया जाणार नाहीत, असे मला मनोमन वाटते. शास्त्रज्ञ के. सीवन व त्यांची टीम अजूनही ‘चांद्रयान-२’शी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. चांद्रयान-२ मोहिमेने भारतीयांच्या मनात घर केले असल्याने तेच मी माझ्या रिक्षावर लिहिले. अनेक प्रवासी रिक्षावर चांद्रयान-२ का लिहिलात असे विचारतात. त्यावेळी चांद्र्रयान-२ मोहिमेबाबतचा आनंद द्विगुणित होतो.- अशोक नागभुजंगेरिक्षाचालक.

टॅग्स :SolapurसोलापूरNASAनासाauto rickshawऑटो रिक्षा