एसटी महामंडळाला डिझेल खर्च भागविणेही आले नाकीनऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 11:55 AM2020-08-30T11:55:35+5:302020-08-30T11:59:08+5:30

प्रवाशांचा प्रतिसाद वाढतोय, पण कासवगतीने

No more passengers for st buses due to corona virus | एसटी महामंडळाला डिझेल खर्च भागविणेही आले नाकीनऊ

एसटी महामंडळाला डिझेल खर्च भागविणेही आले नाकीनऊ

Next
ठळक मुद्देकोरोना संकटामुळे जवळपास पाच महिन्यांपासून एसटी बससेवा सेवा होती ठप्प

राजानंद मोरे-
पुणे : एसटी महामंडळाने आंतरजिल्हा बससेवा सुरू केली असली तरी प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने डिझेलचा खर्च भागविणेही नाकीनऊ येत आहे. प्रवाशांची संंख्या वाढत असली तरी ही वाढ कासवगतीने असल्याने एसटी महामंडळाला दररोज कोट्यावधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. पुण्यात मुंबईकडे धावणाºया एका शिवनेरी बसद्वारे जेमजेम ४ ते ५ हजाराचे उत्पन्न मिळते. तर जवळपास तेवढाच डिझेल खर्च आहे. हीच स्थिती अन्य मार्गावरील हिच स्थिती अन्य मार्गांवरील गाड्यांचीही आहे.

कोरोना संकटामुळे जवळपास पाच महिन्यांपासून एसटी बससेवा सेवा ठप्प होती. राज्यात दि. २० आॅगस्टपासून आंतरजिल्हा एसटी बससेवा सुरू करण्यात आली. पण लोकांच्या मनामध्ये कोरोनाची भिती असल्याने अनेक जण प्रवास करणे टाळत आहेत. बसमधून केवळ २० ते २२ प्रवाशांनाच प्रवास करण्याचे बंधन आहे. पण तेवढे प्रवासीही एसटीला मिळत नाही. सध्या प्रतिसाद वाढत असला तरी अपेक्षेपेक्षा कमी असल्याने महसुलावर परिणाम झाला आहे.

एसटी महामंडळातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात दररोज ३ ते साडे तीन लाख प्रवासी बसचा वापर करत आहेत. त्याद्वारे दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पण लॉकडाऊनपुर्वी ही स्थिती अनुक्रमे ६६ लाख व २२ कोटी अशी होती. 

एसटीच्या पुणे विभागात सध्या ७०० ते ९०० बसफेऱ्या होत असून १२ ते १५ हजार प्रवासी आहेत. लॉकडाऊनपुर्वी दररोज ५ हजार फेºयांद्वारे १ लाख ५५ हजार प्रवासी प्रवास करत होते. अपेक्षित प्रवासी मिळत नसल्याने एसटीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पुणे ते मुंबईदरम्यान धावणाºया शिवनेरी बसला सध्या १० ते १२ प्रवासी मिळत आहेत. तेवढ्या प्रवाशांशिवाय बस हलविली जात नाही. या प्रवाशांतून मिळणारे उत्पन्न व डिझेल खर्च जवळपास सारखाच आहे. त्यामुळे इतर खर्च निघतही नाही. त्यातून सुमारे ६० ते ७० टक्के तोटा सहन करावा लागत आहे. हीच स्थिती इतर मार्गांवरील गाड्यांचीही असल्याचे अधिकारी सांगत आहे.

--------------


राज्याची दैनंदिन स्थिती 
लॉकडाऊनपुर्वी 
प्रवासी - ६६ लाख
महसुल - सुमारे २२ कोटी
सध्या 
प्रवासी - ३ ते ३.५ लाख
महसुल - सुमारे दीड कोटी
----------------------
पुणे विभागाची दैनंदिन स्थिती
लॉकडाऊनपुर्वी 
प्रवासी - सुमारे १२ ते १५ हजार
बसफेºया - ७०० ते ९००
सध्या 
प्रवासी - सुमारे दीड लाख
बसफेऱ्या - सुमारे ५ हजार
---------------------------
प्रति किलोमीटर डिझेल व खर्च
शिवनेरी - प्रति लिटर ३.२ किमी धाव
पुणे ते मुंबई अंतर - सुमारे १७० किमी
प्रति बस प्रवासी - जाणारे - सुमारे १० ते १२ 
प्रवासी उत्पन्न - ४ ते ५ हजार
डिझेल खर्च - सुमारे ४ हजार
इतर खर्च - चालक, वाहक वेतन, देखभाल-दुरूस्ती, साफसफाई, वर्कशॉप व अन्य.
साधी बस - प्रति लिटर ४.५ किमी धाव
--------------------------

Web Title: No more passengers for st buses due to corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.