विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नको; शहापुरातील ‘ती’ शाळा मंगळवारपासून होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 08:21 IST2025-07-12T08:20:49+5:302025-07-12T08:21:26+5:30

या शाळेत घडलेल्या कथित प्रकरणानंतर  पालकांनी गुरुवारी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही.  

No educational loss for students; Controversy school in Shahapur to start from Tuesday | विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नको; शहापुरातील ‘ती’ शाळा मंगळवारपासून होणार सुरू

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नको; शहापुरातील ‘ती’ शाळा मंगळवारपासून होणार सुरू

शहापूर - एका शाळेत घडलेल्या कथित आक्षेपार्ह प्रकरणानंतर शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासंदर्भात उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती जो काही निर्णय घेईल, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी येत्या मंगळवारपासून नियमितपणे शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

तत्पूर्वी सोमवारी पालक व शिक्षक यांची स्वतंत्र बैठक घेऊन कामकाजाचे योग्य नियोजन करण्यात येईल. या शाळेत घडलेल्या कथित प्रकरणानंतर  पालकांनी गुरुवारी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही.  

चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी
यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिक्षण विभाग आणि पालक यांच्यात शुक्रवारी नियोजित केलेली बैठकही झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात येईल, या भीतीने पालकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. बालकल्याण समितीने शारीरिक तपासणीला सामोरे गेलेल्या सर्व मुलींचे शुक्रवारी समुपदेशन केले. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, ५ जणांना अटक करून त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: No educational loss for students; Controversy school in Shahapur to start from Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा