शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019 : सत्ता स्थापनेबद्दल मोदी, शहांशी चर्चा झाली का?; शरद पवार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 11:21 IST

Maharashtra Vidhan Election 2019 : महायुती अन् सत्ता स्थापनेबद्दल शरद पवारांचं मोठं भाकीत

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटत असला तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. मात्र शिवसेना, भाजपाची गाडी सत्तेच्या वाटपावर अडली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांकडून केल्या जाणाऱ्या दबावाच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस फॅक्टर महत्त्वाचा आहे. आमच्यासमोर इतर पर्याय खुले आहेत म्हणत शिवसेना, भाजपा एकमेकांना अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीची भीती दाखवत आहेत. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य करत दोन्ही पक्षांना धक्का दिला. आम्हाला शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत माझं बोलणं झालेलं नाही, हे स्पष्ट करत शरद पवारांनी शिवसेनेच्या दाव्यातील हवा काढून घेतली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांसोबत कोणताही संवाद झालेला नाही असं पवार म्हणाले. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचं पवारांनी सांगितलं. ते सीएनएन-न्यूज18 वृत्तवाहिनीशी बोलत होते.आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत. कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं आम्हाला तसा कौल दिला आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपा कधी सत्ता स्थापन करणार, याची आम्ही वाट पाहोत, असं म्हणत पवारांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. शिवसेना, भाजपामधल्या सुंदोपसुंदीवरदेखील पवार यांनी भाष्य केलं. शिवसेना नेत्यांच्या विधानावरुन भाजपानं त्यांना सत्तेच्या समान वाटपाबद्दल शब्द दिल्याचं जवळपास स्पष्ट होत आहे. त्यामुळे भाजपानं दिलेला शब्द पाळावा, असं पवार म्हणाले. भाजपा, शिवसेनेच्या दबावतंत्राबद्दल आणि सत्ता स्थापनेबद्दल पवारांनी मोठं भाकीत केलं. राज्यातील सत्ता स्थापनेचा प्रश्न 10 दिवसांत सुटेल, असं पवार यांनी म्हटलं आहे. पुढील 10 दिवसांत शिवसेना, भाजपा एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असा अंदाज पवारांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्यासाठी भाजपाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावं लागेल, असं पवार म्हणाले.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा