शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला आंबेडकरांनी पुन्हा दाखवला 'हात'; पण अजूनही 'कबूल' नाही MIMचा 'तलाक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 13:11 IST

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-वंचित आघाडी नाही

मुंबई: एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी उमेदवारांची यादी पाठवल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. वंचितची यादी गणेश विसर्जनानंतर जाहीर होईल, असंदेखील ते म्हणाले. काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याची स्पष्ट भूमिका आंबेडकर यांनी घेतली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकरांनीकाँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल अल्टिमेटम दिला होता. त्यांनी काँग्रेसला 144 जागा देऊ केल्या होत्या. मात्र काँग्रेसला ही ऑफर मान्य नसल्यानं आघाडी होण्याची शक्यता मावळली. यानंतर आता आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट केलं. 'काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकारी मंडळ सदस्यांचा सतत संपर्क होता. मात्र काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्वदेखील चर्चा करण्याच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचा वापर करून घेत असल्याचं या परिस्थितीत वारंवार स्पष्ट झालं. लोकसभा निवडणुकीवेळी आलेला अनुभव पुन्हा एकदा आम्हाला आला. काँग्रेस आघाडीसाठी उत्सुक आहे. मात्र वंचितच त्यासाठी तयार नाही, असं चित्र काँग्रेसकडून निर्माण केलं जात आहे', अशा शब्दांमध्ये आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.काँग्रेससोबतच्या आघाडीबद्दल स्पष्ट भूमिका घेणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना एमआयएमसोबतची आघाडी कायम राहील अशी आशा आहे. जागावाटपात सन्मानजनक वागणूक न मिळाल्याचा आरोप करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघासोबतची आघाडी संपुष्टात आल्याची घोषणा केली. मात्र आंबेडकर यांनी जलील यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली आहे. ओवेसी सांगत नाहीत तोवर आघाडी कायम असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघcongressकाँग्रेस