Nitin Gadkari : माझ्यावर विश्वास ठेवा...पाण्यातून ऑक्सिजन, हायड्रोजन वेगळं काढून विमानं, रेल्वे चालवणार - गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 18:30 IST2022-06-17T18:20:41+5:302022-06-17T18:30:36+5:30
मंत्री आहे आणि काहीही बोलतात मी त्यातला नाही. मी जे बोलतो ते करतो आणि करतो ते बोलतो : नितीन गडकरी

Nitin Gadkari : माझ्यावर विश्वास ठेवा...पाण्यातून ऑक्सिजन, हायड्रोजन वेगळं काढून विमानं, रेल्वे चालवणार - गडकरी
“सध्या मोठी गोष्ट आहे ती म्हणजे ग्रीन हायड्रोजन. पाण्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन काढून हायड्रोजनवर गाड्या चालतील, विमानं, रेल्वे, फॅट्ररी चालणार आहेत. मी वाहतूक मंत्री आहे. मी जे करतो तेच बोलतो आणि बोलतो तेच करतो,” असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी सर्वांशी संवाद साधला.
“माझ्या पत्नीनंही याविषयी प्रश्न विचारला. तेव्हा आपल्यात आणि जनतेत अंतर खुप आहे हे समजलं. मी नंतर टोयोटाची भविष्य ही गाडी आणली. मी दिल्लीत हायड्रोजनवर चालणाऱ्या गाडीत फिरतो आणि लोकांनाही दाखवतो. ग्रीन हायड्रोजन आपल्याकडे लाऊन जनरेटर बसवायचा. त्यातून हायड्रोजन तयार होईल. तो ५०० बारपर्यंत कॉप्रेस करायचा आणि त्यावर ट्रक बसेस चालवालयची. त्यातून वेस्ट टू वेल्थ यातून जो पैसा मिळेल ते भविष्य आहे,” असंही गडकरी म्हणाले.
सरकारनं ३ हजार कोटी रूपये देऊन हायड्रोजन मिशन बनवलं आहे. आपला देश १० लाख कोटी रूपये देऊन पेट्रोल डिझेल आयात करतो. हे १० लाख कोटी शेतकऱ्यांच्या घरात गेले पाहिजे. म्हणून हा हायड्रोजन, इथेनॉल तयार झालं तर तरुणांच्या हाताला काम मिळेल. मी वाहतूक मंत्री आहे, मी या विभागाचा आहे माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा असं मी आताच सांगितलं. नाहीतर मंत्री आहे आणि काहीही बोलतात मी त्यातला नाही. मी जे बोलतो ते करतो आणि करतो ते बोलतो, जर होत नसेल तर तोंडावर ते होत नाही असं सांगतो, असंही ते म्हणाले.