शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकार विषकन्येसारखे, सरकारच्या हस्तक्षेपामुळे प्रकल्प उद्धवस्त होऊ शकतात- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 17:54 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.

Nitin Gadkari Statement: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा ते सार्वजनिक मंचावरुन विरोधकांना टीका करण्यासोबतच सरकारवरही भाष्य करतात. आता नागपुरातील एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरींनी सरकारला 'विषकन्या' म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे.

गडकरी म्हणाले की, 'आजच नाही, तर मी विरोधी पक्षनेता असतानाही एक गोष्ट ठामपणे सांगायचो. लोकांचा देवावर आणि सरकारवर विश्वास आहे. पण सरकारी हस्तक्षेपामुळे प्रकल्प उद्ध्वस्त होऊ शकतात. सरकारचा हस्तक्षेप किंवा सरकारची सावलीही प्रकल्पाला उद्ध्वस्त करू शकते. सरकार विषकन्येसारखे आहे. जे सरकारपासून दूर राहतात त्याची प्रगती होते,' असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी काय म्हणाले गडकरी?कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने नागपुरात आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, 'सरकारच्याही अनेक अडचणी आहेत. देशाचे कृषी उत्पन्न 22 टक्क्यांनी वाढवायचे आहे आणि ज्या दिवशी आपण हे करू, त्या दिवशी शेतकऱ्यांची मजुरी 1500 होईल. आज हे सर्वात मोठे ध्येय आपल्यासमोर आहे. सरकारमधील अडचणी वेगळ्या आहेत. या वर्षी एमएसपी देताना अडचणी आल्यात. बाजारभाव आणि एमएसपी यांच्यात समतोल साधण्यासाठी बाजारभाव कमी आणि एमएसपी जास्त आहे. सरकारला दीड लाख कोटी रुपये द्यावे लागतील आणि घेतलेले धान्य ठेवण्यासाठी गोदाम नाहीत. किती गडबड झाली देव जाणे, मंत्री असल्याने मलाही बोलण्याच्या मर्यादा आहेत,' असंही गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाGovernmentसरकारnagpurनागपूर