नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्याकडे फार लक्ष देऊ नये; प्रकाश आंबेडकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 06:49 PM2024-02-23T18:49:17+5:302024-02-23T18:50:08+5:30

Prakash Ambedkar On Nitesh Rane : आमदार निलेश राणे हे अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी पोलिसांविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Nitesh Rane's 'that' statement should not be paid too much attention; Criticism of Prakash Ambedkar | नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्याकडे फार लक्ष देऊ नये; प्रकाश आंबेडकरांची टीका

नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्याकडे फार लक्ष देऊ नये; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar On Nitesh Rane : (Marathi News) मुंबई : भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे हिंदू जनआक्रोष मोर्चाच्या निमित्ताने राज्यभर आंदोलन करुन सभा घेत आहेत. दरम्यान, निलेश राणे हे अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी पोलिसांविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर विरोधकांनी नितेश राणे यांच्यासह सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. याबाबत वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना विचारले असता नितेश राणे वेडा आमदार असून, त्यांना फार महत्त्व देऊ नये. त्यांच्या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी नितेश राणे यांच्याविषयी म्हणाले की, नितेश राणे यांच्या यांच्यावर कारवाई होऊ शकते, मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करू नये. त्यांच्यावर कारवाई न करता त्यांच्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष करावे व सोडून द्यावे. एक वेडा आमदार, खासदार बोलतोय असे म्हणावे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. त्यांच्या बोलण्याचा किंवा त्यांच्या बेताल वक्तव्याचा कोणताही परिणाम लोकांवर आणि समाजावर होत नाही. त्याकडे फार लक्ष देऊ नये, असे प्रकाश आंबेडकर स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, आमदार निलेश राणे हे अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी पोलिसांविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. पोलीस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही? ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, असे वादग्रस्त विधान आमदार नितेश राणे यांनी केले होते. त्याआधी सोलापूरमधील सभेत आमचा बॉस सागर बंगल्यावर बसतो, त्यामुळे पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, असेही आमदार नितेश राणे यांनी विधान केले होते. 

याआधीही वेडा आमदार म्हणून उल्लेख!
हिवाळी अधिवेशनात भाजपा आमदार नितेश राणे यांनी फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या सलीम कुत्तावरून अनेक आरोप केले होते. त्यानंतर आमदार नितेश राणे यांच्या आरोपावर बोलताना काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी नितेश राणे हे वेडे झाले असून, ते उल्लेख करत असलेला सलीम कुत्ता मृत्यू झाल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले होते. कैलास गोरंट्याल यांनी म्हटले होते की, मी जो सलीम कुत्ता सांगतोय त्याचा 1998 साली मृत्यू झाला आहे. आता नितेश राणे सांगत आहेत, तो चुकीचा सलीम कुत्ता आहे. नितेश राणे वेडे आहेत. माझी चौकशी करायची करा, मी 24 तास इकडे  आहे. पण, माझी बदनामी करणार असेल तर मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला होता.

Web Title: Nitesh Rane's 'that' statement should not be paid too much attention; Criticism of Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.