शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:24 IST

बडगुजर उद्धवसेनेत असताना भाजपा नेते नितेश राणे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप लावले होते.

मुंबई - नाशिकमधील उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाने त्यांच्यावर आरोप करणाऱ्या भाजपा नेत्यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले. गिरीश महाजन यांनी नाशिकमधील हा पक्षप्रवेश घडवून आणला. परंतु या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजपा आमदारांनी विरोध केल्याचे दिसून आले होते. त्यातच आज बडगुजर यांचा पक्षात प्रवेश होताच मंत्री नितेश राणे यांचेही सूर बदलल्याचे दिसून आले.

मंत्री नितेश राणे म्हणाले की, सुधाकर बडगुजर यांचा हल्लीचा प्रवास हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे. नाशिकमधील हिंदू सकल मोर्चात आमच्या खांद्याला खांदा लावून त्यांचा मुलगा हिंदुत्वाचा आवाज पुढे नेत होता. त्यामुळे जर हिंदुत्व भक्कम होत असेल आणि हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला कुणी तयार असेल तर कोणाला आक्षेप घेण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

नितेश राणेंनी लावले होते गंभीर आरोप

बडगुजर उद्धवसेनेत असताना भाजपा नेते नितेश राणे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. विधानसभेत नितेश यांनी एक फोटो दाखवून दहशतवादी सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांचे कनेक्शन असल्याचे म्हटले होते. नितेश राणे म्हणाले होते की, १९९३ च्या मुंबईत बॉम्बस्फोटात आरोपी दाऊदचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता याच्या पॅरोल दरम्यान एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता. सलीम बॉम्बस्फोटातील आरोपात दोषी आढळला होता. या स्फोटात २५७ लोक ठार झाले होते तर ७०० हून अधिक जखमी होते. 

नितेश राणे यांनी विधानसभेत सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचा फोटो दाखवून केलेल्या आरोपाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता याच सुधाकर बडगुजर यांना भाजपात घेण्यात आले आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारली असता हिंदुत्वासाठी कोण काम करायला तयार असेल तर आक्षेप घेण्याचं कारण नाही असं सांगितले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेterroristदहशतवादी