शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्माण केलेले ‘निर्भय’ पथकच असुरक्षित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 19:15 IST

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात पेट्रोलियमसाठी गेलेल्या निर्भया पथकाच्या महिला पोलीस व पोलिसाला मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्माण केलेल्या या पथकाच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरनिर्भया पथकाने बारामती व इंदापूर तालुक्यात १४०० हून अधिक रोडरोमिओंवर धडक कारवाई निर्भया पथकात संख्या बळ वाढवून विशेष पथक नेमण्याची गरज सध्या बारामती व इंदापूर तालुक्यात एक महिला अधिकारी एक पुरुष अधिकारी तर तीन महिला पोलीस कार्यरत

बारामती : बारामती एमआयडीसी परिसरात निर्भय पथकातील महिलापोलिसालाच एकाने मारहाण करुन दमदाटी केल्याचा प्रकार शनिवारी (दि २२) सकाळी घडला. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात पेट्रोलियमसाठी गेलेल्या निर्भया पथकाच्या महिला पोलीस व सोबतच्या सहकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी विजय गोफणे (रा. वंजारवाडी  ता. बारामती) याच्यावर विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणून दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्माण केलेल्या या पथकाच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे पथकच असुरक्षित असल्याचे वास्तव आहे.    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि.२२ ) सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या आरोपी गोफणे याने रस्त्यातच मुलांना सोबत घेऊन रस्ता अडवला होता.यामुळे निर्भया पथकाच्या महिला पोलिसांनी रस्त्यात असे थांबू नका असे सांगितले. त्यावर त्याने महिला पोलिसांनाच उलट सुलट भाषा वापरून, शिवीगाळ,दमदाटी केली. तसेच महिला पोलिसाचा हात पिरगळत व कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला असतानाच पथकातील इतर पोलीस सहकारी त्यांना सोडविण्यासाठी धावले.यावेळी आरोपीने त्यांनाही जबर मारहाण केली.यावेळी पोलीस पाठलाग करत असताना आरोपी गोफणे हा तेथून फरार झाला. एवढा गंभीर प्रकार घडत असताना देखील इतरांनी बघ्याची भुमिका घेतली. शुक्रवारी इंदापूरच्या महाविद्यालयाच्या समोर रिक्षात गॉगल घालून मुलींच्या मागे टोमणे मारणाऱ्या एकाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या पथकाच्या महिला पोलिसालाच मारहाण करण्याची धमकी देण्यात आली होती....................गेल्या दोन वर्षात बारामती विभागाच्या निर्भया पथकाने बारामती व इंदापूर तालुक्यात १४०० हून अधिक रोडरोमिओंवर धडक कारवाई केली आहे. पथकाच्या कारवाईच्या धडाक्यामुळे रोडरोमिंओंवर चांगला जरब बसला आहे. त्याची दखल घेत पथकाला पुणे जिल्हयात सर्वोतम कामगिरीबाबत प्रथम क्रमांक देण्यात आला होता. मात्र ,आज घडलेल्या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.——————————————————— विशेष पथक कधी नेमणार निर्भया पथकाबरोबरच विशेष पथक नेमणार असल्याचे झारगडवाडीच्या प्रकरणानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.मात्र, अद्यापही या विशेष पथकाची  अंमलबजावणी होतांना दिसत नाही. तसेच दामिनी पथक नक्की अस्तित्वात आहे का? याची माहिती मिळणे आवश्यक आहे. मार्शलबिटच्या दिलेल्या दुचाकीचा कुठेही वापर होतांना दिसत नाही.त्यामुळे दामिनी पथक,मार्शल बीट पथक प्रभावीपणे कार्यान्वित होण्याची गरज आहे.—————————————— निर्भया पथकात महिला पोलिसांचे बळ वाढविण्याची गरज निर्भया पथकात महिला पोलीसांचे संख्या बळ वाढवून पुरुषांची संख्याही वाढवणे गरजेचे आहे.सध्या बारामती व इंदापूर तालुक्यात एक महिला अधिकारी एक पुरुष अधिकारी तर तीन महिला पोलीस कार्यरत आहेत. यामुळे घडलेल्या प्रकरणाबाबत  जिल्हा अधीक्षक संदीप पाटील यांनी दखल घेऊन निर्भया पथकात संख्या बळ वाढवून विशेष पथक नेमण्याची गरज आहे. ——————————-

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBaramatiबारामतीPuneपुणेPoliceपोलिसWomenमहिला