शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

NIA ची मोठी कारवाई! ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणी छापे, संशयितांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 09:04 IST

राज्यात एनआयए आणि एटीएसने संयुक्तपणे ही कारवाई केली.

दहशतवाद्यांशी संपर्क आणि कट रचल्याच्या संशयावरून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे. आज (शनिवार) एनआयएने कर्नाटक आणि महाराष्ट्रात पहाटेपासून कारवाई करत अनेक संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रात ठाणे, पुणे आणि इतर ठिकाणी एनआयए आणि एटीएसने छापेमारी केली.मिळालेल्या माहितीनुसार, इसिसच्या दहशतवादी कट प्रकरणात कर्नाटक आणि महाराष्ट्रात आज सकाळपासून एनआयएने एकूण ४४ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये कर्नाटमध्ये १, तर महाराष्ट्रात ४३ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुणे १, ठाणे ग्रामीण ३१, ठाणे शहर १ आणि भाईंदरमधील एका ठिकाणाचा समावेश आहे.  राज्यात एनआयए आणि एटीएसने संयुक्तपणे ही कारवाई केली. 

पुण्यातील कोंढव्यात एनआयएचे छापे-

राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने कोढव्यात दोन ठिकाणी छापे घालून सर्च केल्या. कल्याण येथील सादाब शेख व कॅम्पमधील अन्वर अली शेख हे कोंढव्यात भाड्याने जागा घेऊन रहात होते. एनआयएने त्यांच्या घरावर शनिवारी सकाळी छापे घातले. यावेळी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एनआयएच्या पथकाला येथे काय हाती लागले, याची माहिती मिळू शकली नाही.

या छापेमारीत सापडलेले दहशतवादी हे देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब ब्लास्टचे साहित्यही एनआयएने जप्त केले आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात देशभरात दहशतवाद आणि हिंसाचार पसरविण्याच्या पुणे इसिस मॉड्युल प्रकरण उघडकीस येत असताना पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला मोहम्मद शाहनवाज आलम दहशतवाद्याला एनआयएने अटक केली होती. त्याच्याविरुद्ध दिल्लीत दहशतवादी कृत्य केल्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPuneपुणेthaneठाणेAnti Terrorist SquadएटीएसCrime Newsगुन्हेगारी