धक्कादायक! मेकअप टिकत नसल्यानं नवविवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 14:27 IST2019-02-14T14:27:46+5:302019-02-14T14:27:53+5:30

महिलेच्या आत्महत्येनं परिसरात खळबळ

newly married woman commits suicide in nashik | धक्कादायक! मेकअप टिकत नसल्यानं नवविवाहितेची आत्महत्या

धक्कादायक! मेकअप टिकत नसल्यानं नवविवाहितेची आत्महत्या

नाशिक: मेकअप टिकत नसल्यानं नाशिकमध्ये एका महिलेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. नाशिकच्या अंबडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आत्महत्या करणारी महिला नवविवाहित असल्याची माहिती मिळते आहे. 

नाशिकच्या अंबडमधील दत्तनगर भागात एका महिलेनं आत्महत्या केली. नायलॉनच्या दोरीनं गळफास घेऊन महिलेनं जीवन संपवलं. या महिलेच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. 'माझ्या डोळ्यातून सतत पाणी येतं. त्यामुळे डोळ्यांना काजळ लावता येत नाही. याशिवाय चेहऱ्यावर मेक अपदेखील टिकत नाही', असा मजकूर या चिठ्ठीत आहे. हा मजकूर पाहून अनेकांना धक्का बसला. आत्महत्या केलेल्या महिलेचा विवाह काही दिवसांपूर्वीच झाला होता. त्यामुळे या आत्महत्येमागे इतर काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. 

Web Title: newly married woman commits suicide in nashik