शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

नव्या वर्षात राज्यात थंडीचे आगमन; नाशिकचा पारा घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 9:24 PM

पुण्यात यंदा प्रथमच पारा १० अंशावर

ठळक मुद्दे२ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यताविदर्भात बहुतांश ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत घट कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट

पुणे : अरबी समुद्रातील वातावरणात बदल झाल्याने संपूर्ण डिसेंबर महिन्यात राज्यातील तापमानात नेहमीच चढे राहिले असताना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १०़३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ विदर्भात मात्र अनेक ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमान आता सरासरीच्या जवळपास आले आहे. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. २ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे १०. ८, लोहगाव ११.७, जळगाव १४.६, कोल्हापूर १६.१, महाबळेश्वर १३.१, मालेगाव १४.२, नाशिक १०.३, सांगली १५.३, सातारा ११.८, सोलापूर २०.३, मुंबई १७, सांताक्रुझ १५, अलिबाग १५.७, रत्नागिरी १७.१, पणजी २०.४, डहाणु १४.७, उस्मानाबाद १४.८, औरंगाबाद ११.६, परभणी १६.६, नांदेड १६.५, बीड १५.२, अकोला १३.९, अमरावती १३.६, बुलढाणा १३.८, ब्रम्हपुरी १२.९, चंद्रपूर १०.६, गोंदिया १४, नागपूर १३.४, वाशिम १५, वर्धा १३.८, यवतमाळ १४़

पुण्यात यंदा प्रथमच पारा १० अंशावरसंपूर्ण डिसेंबर महिन्यात थंडीची अतुरतेने वाट पहायला लावणाऱ्या पुणेकरांना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी थंडीचा कडाका जाणवण्यास सुरुवात झाली आहे़. यंदा प्रथमच शहरातील तापमान १०.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे़. पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. 

टॅग्स :PuneपुणेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनweatherहवामानTemperatureतापमानRainपाऊस