मुंबई - शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी वार्षिक वेळापत्रक जारी केले आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी व माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी २६ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार हे वेळापत्रक अमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.
शिक्षकांच्या प्रशासकीय वेळापत्रकात अध्यापनाबरोबरच जबाबदाऱ्यांवरही भर देण्यात आला आहे. दररोज, आठवड्यातून तसेच दरमहा करावयाची कामे स्पष्ट करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांची प्रगती तपासणे, अप्रगत विद्यार्थ्यांना उपचारात्मक मार्गदर्शन करणे, शाळांच्या प्रशासकीय कामांमध्ये स्वच्छता राखणे, आनंददायी शनिवारसारखे उपक्रम राबविणे आणि स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन देणे, यावर भर आहे.
'काटेकोर पालन करा'- शाळांसह सर्व शिक्षण विभागाच्या कार्यालयांना वेळापत्रकाचे पालन करणेआवश्यक- दररोज, साप्ताहिक व मासिक कामांचे वेळापत्रक निश्चितअप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक- मार्गदर्शनाची तरतूदप्रशासकीय जबाबदाऱ्या व योजनांची काटेकोर अंमलबजावणीपरीक्षा तयारी, शाळा दुरुस्ती आणि गुणपत्रकाचे नियोजन
शिक्षण विभागाच्या आदेशात काय नमूद ?- एप्रिलमध्ये परीक्षा तयारी चाचण्या, शाळांची देखभाल दुरुस्ती व दहावी-बारावीचे गुणपत्रक तयार करणे यासारखी कामे नियोजनानुसार करावीत.- विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी केवळ अध्यापनच नव्हे तर व्यवस्थापकीय कार्यातही सहभाग घ्यावा.- शिवाय, त्यासोबत तालुका, विभाग, जिल्हा, राज्य स्तरावरील शिक्षण विभागातील कार्यालयातील संबंधित कर्मचारी-अधिकाऱ्यांनादेखील पालन करावयाचे आहेया वेळापत्रकामुळे कामकाज अंमलबजावणी करणे अधिक परिणामकारक होईल.