शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
2
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
3
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
4
गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
5
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
6
मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
7
Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
8
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
9
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
10
ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU Machine नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या
11
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
12
Virat Kohli New Record : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत विराटच ‘धुरंधर’! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
13
वेदांताच्या शेअर्सचा विक्रमी उच्चांक: ४ दिवसांत १३% वाढ; 'नुवामा'कडून ८०६ रुपयांचं नवं टार्गेट
14
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
15
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
16
Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत; उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी
17
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
18
PADU Machine: "मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
19
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
20
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद, महापालिकांची नव्याने आरक्षण सोडत; आयोग लागला कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:07 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे, ५० टक्क्यांची मर्यादा न ओलांडता उर्वरित सर्व निवडणुका वेळेत पार पडण्याची शक्यता आहे.

Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर आता राज्याचा निवडणूक आयोग युद्धपातळीवर कामाला लागला आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे, अशा सर्व जिल्हा परिषदा आणि २ महानगरपालिकांमध्ये लवकरच नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे.  महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगर पालिका या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याची बाब समोर आली आहे. 

मर्यादा राखण्यासाठी आरक्षणाची फेरसोडत

राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडली जाऊ नये, यासाठी ही नवी प्रक्रिया हाती घेण्यात येत आहे. आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा महिला ओबीसी आणि सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी सोडत काढण्याची शक्यता आहे. ही नव्याने आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आयोगाला साधारणपणे १५ दिवसांचा कालावधी लागण्याची अपेक्षा आहे.

डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या निवडणूक आयोगाकडून डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका व्हाव्यात यासाठी वेगाने हालचाली सुरू असल्याचे म्हटलं जात आहे. नवी आरक्षण प्रक्रिया तातडीने पूर्ण करून आयोगाने निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण

यापूर्वी, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर आज (सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. कोर्टाने निवडणुकीला कोणताही स्थगिती दिली नाही, त्यामुळे जाहीर झालेला कार्यक्रम सुरूच राहील. मात्र न्यायालयाने एक महत्त्वाची अट ठेवली आहे. ज्या ४० नगर परिषदा आणि १७ नगर पंचायतींमध्ये तसेच २ महानगरपालिकांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे, त्या निवडणुकांचे निकाल २१ जानेवारी रोजी होणाऱ्या अंतिम निकालावर अवलंबून असतील, असे कोर्टाने स्पष्ट केले. याचा अर्थ, आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अंतिम निकालापर्यंत टांगती तलवार कायम राहील.

सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या शिफारशींचा सविस्तर आढावा आणि त्यातील ओबीसी संख्या निश्चित करण्याच्या पद्धतीवर पुढील सुनावणीत चर्चा करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, आगामी जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका घेताना ५० टक्क्यांवर आरक्षण नको, असेही निर्देश न्यायालयाने स्पष्ट केले आहेत.

राज्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिका

नंदुरबार १०० टक्के

पालघर ९३ टक्के

गडचिरोली ७८ टक्के

नाशिक ७१ टक्के

धुळे ७३ टक्के

अमरावती ६६ टक्के

चंद्रपूर ६३ टक्के

यवतमाळ ५९ टक्के

अकोला ५८ टक्के

नागपूर ५७ टक्के

ठाणे ५७ टक्के

गोंदिया ५७ टक्के

वाशिम ५६ टक्के

नांदेड ५६ टक्के

हिंगोली ५४ टक्के

वर्धा ५४ टक्के

जळगाव ५४ टक्के

भंडारा ५२ टक्के

लातूर ५२ टक्के

बुलढाणा ५२ टक्के 

English
हिंदी सारांश
Web Title : Redrawing Reservation: District Councils, Corporations Face Fresh Lottery After Court Order

Web Summary : Following a Supreme Court directive on 50% reservation limits in local body elections, Maharashtra's election commission is set to redraw reservations for District Councils and Corporations exceeding the limit. A fresh lottery for women, OBC, and general seats is expected, with the commission aiming to complete the process in 15 days before December elections.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय