न्यू इंडिया घोटाळ्यातील आरोपी आला शरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 06:33 IST2025-03-17T06:33:37+5:302025-03-17T06:33:55+5:30
अरुणला अटक करण्यासाठी पोलिस पथक त्याच्या घरी गेले होते. त्याच्याविरूद्ध ‘लूक आऊट सर्क्लुलर’ही जारी करण्यात आले होते.

न्यू इंडिया घोटाळ्यातील आरोपी आला शरण
मुंबई : न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळ्यातील फरार आरोपी उन्ननाथन अरुणाचलम उर्फ अरुणभाई अखेर महिनाभराने आर्थिक गुन्हे शाखेला शरण आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मेहतासह, धर्मेश पौन, अभिमन्यू भोअन, उल्लनाथन अरुणाचलम याचा मुलगा मनोहर यांच्यापाठोपाठ गैरव्यवहारातील १२ कोटी रुपये खात्यात जमा झालेला आरोपी कपिल देधिया यांना अटक केली आहे. मालवणीतील रहिवासी असलेल्या अरुणभाईला मुख्य आरोपी हितेश मेहताने ट्रस्टच्या माध्यमातून पैसा ब्लॅकचा व्हाइट करण्यासाठी ४० कोटी रुपये दिले होते. अरुणला अटक करण्यासाठी पोलिस पथक त्याच्या घरी गेले होते. त्याच्याविरूद्ध ‘लूक आऊट सर्क्लुलर’ही जारी करण्यात आले होते.
महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता
अरुणला पळून जाण्यात मदत केल्याच्या आरोपाखाली आर्थिक गुन्हे शाखेने त्याचा मुलगा मनोहरला अटक केली. तरीसुद्धा अरुण पोलिसांना सापडत नव्हता.
गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या अरुणने रविवारी सकाळी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात शरणागती पत्करली. त्याला अटक करण्यात आली आहे. अरुणभाईच्या अटकेमुळे या प्रकरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.