नाणार समर्थक मेळाव्यात नेपाळी नागरिक आणले; उदय सामंतांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 17:21 IST2020-03-03T17:21:09+5:302020-03-03T17:21:27+5:30
नेपाळच्या लोकांसमोर सभा घेण्याचं उदिष्ट काय होतं, हे मला देखील कळले नसल्याचे सामंत म्हणाले.

नाणार समर्थक मेळाव्यात नेपाळी नागरिक आणले; उदय सामंतांचा आरोप
मुंबई : नाणार रिफायनरी प्रकल्पावरून समर्थक आणि शिवसेनामधील वाद काही थांबायला तयार नाही. त्यामुळे दोन्ही कडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केली जात आहे. तर शिवसेनेने नाणार रिफायनरी प्रकल्पालाच्या विरोधात मेळावा घेतल्यानंतर समर्थकांकडून सुद्धा मेळावा घेण्यात आला आहे. तर ह्या समर्थन मेळाव्यात नेपाळी नागरिक आणण्यात आले होते, असा आरोप उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
सामंत म्हणाले की, नाणार रिफायनरी प्रकल्पालाच्या समर्थनात घेण्यात आलेल्या मेळाव्यात नेपाळवरून लोकं आणली गेली होती. नेपाळच्या लोकांनाही रिफायनरी आवश्यक आहे, हे काल झालेल्या मेळाव्यातील लोकांच्या भाषाणातून सिद्ध झालं आहे. पण स्थानिक लोकांना हे रिफायनरी प्रकल्प नकोय, त्यामुळे आदल्यादिवशी झालेल्या विरोधी मेळाव्यात जवळपास 7 हजार लोकं उपस्थित होते.
त्यामुळे रिफायनरी समर्थनात घेण्यात आलेल्या मेळाव्यात नेपाळची लोकं आली कशी, याचं मला आश्र्चर्य वाटत आहे. तर नेपाळच्या लोकांसमोर सभा घेण्याचं उदिष्ट काय होतं, हे मला देखील कळले नसल्याचे सामंत म्हणाले.
तसेच या प्रकल्पाला समर्थन करणाऱ्यांची जागा तिथे नाही ना ? याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. ज्यांची जागा आहे, त्यांना ती कदाचित शेतकऱ्यांना परत द्यावी लागती त्यामुळे कुणाच्यातरी पोटामध्ये पोटशूळ निर्माण झालं असेल, त्यामुळे ही सभा झाली असेल असेही सामंत म्हणाले.