शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

आमच्या वरचेही आमचं नेतृत्त्व मानत नाहीत - लक्ष्मण मानेंची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 9:43 PM

आमच्यासारख्या छोट्या जातींना राजकीय प्रतिनिधीत्त्व अजिबात मिळाले नाही.

पुणे : बौद्ध, वंजारी, मातंग आदी जातींना राजकीय प्रतिनिधीत्त्व मिळाले. पण आमच्यासारख्या छोट्या जातींना राजकीय प्रतिनिधीत्त्व अजिबात मिळाले नाही. जातीबद्ध समाजातले अगदी वरचे तर आम्हाला स्विकारतच नाहीत. पण उतरंडीत आमच्या वरअसणारेही आमचे नेतृत्त्व स्विकारत नाहीत, अशी खंत महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी व्यक्त केली.  बेलदार, कंजारभाट, वडार, कैकाडी यासारख्या बलुतेदारांमधल्या छोट्या जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती याच खºया अथार्ने वंचित आहेत. आम्हीच गेलो होतो प्रकाश आंंबेडकरांकडे आमचे नेतृत्त्व करा म्हणून सांगायला. पण उंट तंबूत शिरला आणि आम्हालाच बाहेर पडावे लागले. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या ४१ लाख मतांमध्ये आमचाही वाटा मोठा आहे,ह्णह्ण असे माने यांनी स्पष्ट केले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत आंबेडकर कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीत सहभागी होणार असतील तर मी दोन मिनिटात माझा अजेंडा गुंडाळून त्यांच्यासोबत जाईन, असेही माने म्हणाले. शनिवारी (दि. ३) ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. शासकीय आकडेवारीनुसार राज्यात विमुक्त जाती अणि भटक्या जमातींची संख्या १२ टक्के आहे. परंतु, गेल्या सत्तर वर्षात आम्हाला राजकीय प्रतिनिधीत्व दिले गेले नाही. अनुसूचित जाती जमातीतल्या कैक जाती सत्तेपासून कोसो दूर आहेत. आम्हाला सोडूनच ७० वर्षांचा कारभार झालेला आहे. त्यामुळे खरा वंचितांचा पक्ष आमचाच आहे. महाराष्ट्रीय मुस्लिमांची स्थितीसुद्धा आमच्यापेक्षा वेगळी नाही. त्यांचे नेतृत्त्वही राज्याबाहेरुन येणाºया श्रीमंत मुस्लिमांनी केले आहे, असे माने म्हणाले. 

तर राक्षसा बरोबरही जाऊविधानसभा निवडणुकीत आम्हाला जागा सोडण्यासंदर्भात कोणत्याच पक्षाने प्रतिसाद दिलेला नाही. येत्या ९ आॅगस्टपर्यंत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी जागा वाटपासंबंधी आमच्याशी सन्मानपूर्वक बोलणी केली नाहीत तर आम्ही उजव्या, प्रतिगामी पक्षांबरोबरही तडजोड करु शकतो. परंतु, उपेक्षित वंचित समाजाला सत्तेत घेऊन गेल्याशिवाय थांबणार नाही. मग राक्षसाशी तडजोड करावी लागली तरी चालेल, असे लक्ष्मण माने म्हणाले. मात्र नंतर खुलासा करताना ते म्हणाले, की ह्यतिकडेह्ण रांगा लागल्या आहेत. आमची काय गरज त्यांना? आम्हाला ते घेणार नाहीत, आम्ही पण जाणार नाही. 

चौकट राज्यात साठ-सत्तर जागा लढवण्याचे आमचे नियोजन आहे. यातल्या पाच-सात जागा तर निश्चितपणे जिंकता येतील. ऐनवेळी उमेदवार ठरवणे शक्य नसल्याने स्वतंत्र लढण्याची तयारी आम्ही चालू केली आहे.-लक्ष्मण माने 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणlaxman maneलक्ष्मण माने