शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी फलोत्पादन संस्था स्थापण्याची गरज - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 14:37 IST

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शुगर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर फलोत्पादन संशोधन संस्था व कृषीउत्पादन विपणन संघ स्थापण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

 नाशिक - शेतकरी एकत्र येत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत कृषी उत्पादन वाढवत आहे. कृषी उत्पादक विपणन कंपन्यांचे माध्यमातून कृषी मालाची विक्रीही वाढत आहे, मात्र हे करत असताना सर्वांनाच विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, या समस्या सोडविण्यासाठी शुगर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर फलोत्पादन संशोधन संस्था व कृषीउत्पादन विपणन संघ स्थापण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे शेतक-यांनी स्थापन केलेल्या कृषी माल आणि प्रक्रि या कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी शेतक-यांच्या समस्या जाणून त्यांना मार्गदर्शन केले.  पवारांना असलेल्या आधुनिक शेतीच्या अद्ययावत ज्ञानाबद्दल येथील तज्ज्ञ आणि शेतकरीही अवाक झाले.कादवाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे,आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह शेतकरी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. पवार यांनी दौर्यात सह्याद्री फार्म येथे शेतकर्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले. वाघाड पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून वाघाड लाभक्षेत्रातील शेतक-यांनी वाघाड धरणातील पाण्याचे स्वयंस्फूर्तीने व्यवस्थापन करून आणि आधुनिक शेतीची कास धरल्याने हा परिसर आता सुजलाम सुफलाम बनला आहे.तर सह्याद्री फार्मच्या माध्यमातून येथील शेतक-यांनी कुठल्याही दलाल आणि व्यापा-यांशिवाय स्वत:च शेतमालाचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग सुरू केले असून देशातील इतर शेतक-यांसाठी शेतीचे हे स्वयंपूर्ण मॉडेल आदर्शवत ठरत आहेत. याची पाहणी शरद पवार यांनी करत येथील शेतकर्यांच्या संघिटत प्रयत्नांचे कौतुक केले. सह्याद्री फार्म वर अद्याक्ष विलास शिंदे यांनी स्वागत करत उपक्रमाची माहिती दिली. शरद पवार यांनी शेतक-यांच्या समस्या जाणून घेत अगदी तंत्रशुद्ध माहिती देत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी सरकारवर कोणतीही राजकीय टिकाटिपण्णी न करता शेतक-यांनी संघटित येत करायची वाटचाल यावर भाष्य केले.

टॅग्स :FarmerशेतकरीSharad Pawarशरद पवारIndiaभारतagricultureशेती