मशिनमध्ये पैसे टाका आणि सात-बारा मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:52 AM2017-10-02T00:52:28+5:302017-10-02T00:54:01+5:30

सात-बारा काढण्यासाठी शेतक-याला तलाठी कार्यालयात वारंवार खेटे मारावे लागतात. अनेकदा खेटे घालूनही कागदपत्रांअभावी सात-बारा मिळत नाही. मात्र, आता..

Make money in the machine and get seven-bar | मशिनमध्ये पैसे टाका आणि सात-बारा मिळवा

मशिनमध्ये पैसे टाका आणि सात-बारा मिळवा

Next

वैभव गायकर
पनवेल : सात-बारा काढण्यासाठी शेतक-याला तलाठी कार्यालयात वारंवार खेटे मारावे लागतात. अनेकदा खेटे घालूनही कागदपत्रांअभावी सात-बारा मिळत नाही. मात्र, आता सात-बारा काढण्याची प्रक्रि या सोपी होणार असून, पनवेलकरांना तहसील कार्यालयात वारंवार खेटे मारावे लागणार नाहीत. डिजिटल इंडिया उपक्र मांतर्गत पनवेल तहसील कार्यालयामार्फत डिजिटल केआॅस मशिन बसविण्यात आली आहे. या मशिनमुळे शेतक-यांना एका क्लिकवर आपला सात-बारा मिळवता येणार आहे.
एटीएमच्या धर्तीवर ही मशिन बसवली गेली असून, तिचा वापरही अगदी सहज सोप्या पद्धतीने केला जाणार आहे.
डिजिटल इंडिया ही संकल्पना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविली आहे. या धर्तीवर रायगड जिल्ह्यात प्रथमच पनवेल तहसील कार्यालयात सात-बारा काढण्यासाठी केआॅस मशिन बसविण्यात आली आहे.
उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्या आमदार निधीमधून ही केआॅस मशिन पनवेल तहसील कार्यालयात बसविण्यात आली आहे. मशिन वरील स्क्र ीनवर जिल्हा, तालुका, तसेच आपला मोबाइल नंबर टाकल्यावर जमिनीचा सर्व्हे क्रमांक स्क्र ीनवर दिसतो. त्याठिकाणी क्लिक केल्यावर अवघ्या २३ रु पयांत सात-बारा आपल्या हातात मिळणार आहे. या मशिनमुळे शासकीय यंत्रणेवर पडणारा ताण कमी होईल. तसेच अर्जदाराची वारंवार माराव्या लागणाºया हेलापाट्यातून सुटका होईल.
पनवेल तालुक्यात एकूण १७८ गावे आहेत. त्यापैकी १०५ गावे डिजिटल झाली आहेत. उर्वरित ७३ गावे डिजिटल होण्याच्या मार्गावर असल्याने या मशिनचा वापर ख-या अर्थाने सुरू झालेला नाही. मात्र, लवकरच ही मशिन सुरू होणार आहे. सुरुवातीला मशिन वापराबाबत माहिती देण्यासाठी एका चालकाची नेमणूकही करणार असल्याची माहिती पनवेलच्या नायब तहसीलदार कल्याणी कदम यांनी दिली.
संबंधित इलेक्ट्रॉनिक केआॅस मशिनची किंमत १ लाख ९० हजार रुपये एवढी आहे. पनवेलमधील जवळ जवळ ९० हजारांपेक्षा जास्त सात-बारा उताºयांचे आॅनलाइन रेकॉर्ड या मशिनमध्ये असणार आहे. तहसील कार्यालयातच विद्युत जोडणी दिल्यानंतर ही मशिन सुरू होणार आहे. मराठी भाषेतच डिस्प्लेवर दिलेले पर्याय निवडून आपल्याला सात-बारा उतारा मिळवता येणार आहे. आपण एटीएम ज्या प्रकारे हाताळतो, त्याच प्रकारे या मशिनचा वापर असणार असल्याची माहिती नायब तहसीलदार कल्याणी कदम यांनी दिली.

Web Title: Make money in the machine and get seven-bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी